मिलिंदा पवार वडूज सातारा
सातारा – वडुज मराठी साहित्य मंडळ ठाणे या प्रख्यात संस्थेची शाखा मराठी सााहित्य मंडळ शाखा खटाव या नावाने वडुज येथे कार्यान्वित करण्यात आली.या वेळेस मराठी साहित्य मंडळातील कार्यकारिणी स्थापन करून त्यातील सर्व पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ शिवाजी कॉलेज वडूज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक ३ ऑगस्ट रोजी पार पडला.
साहित्यिक , सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाची दखल घेऊन संस्थेच्या निवड समितीने मराठी साहित्य मंडळाची पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. मराठी साहित्य मंडळ खटाव तालुका अध्यक्षपदी सीमा मंगरुळे यांना हे पद देण्यात आले. सीमा मंगरुळे यांना राज्यस्तरीय विविध पुरस्कार प्राप्त आहेत तसेच त्यांचा अंतरंग हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे व त्याला राज्य स्तरीय पुरस्कारही मिळाला आहे.मराठी साहित्य मंडळ खटाव तालुका उपाध्यक्षपदी डॉ. एस बी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी प्राणिशास्त्र या विषयावर पुस्तके लिहिली असून अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत तसेच शिवाजी कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून ते कार्यरत आहेत. मराठी साहित्य मंडळ सचिव म्हणून लाभलेले सुहास पवार हे नवजीवन हायस्कूल बिदाल येथे सध्या कार्यरत आहेत. पुस्तकांचे लेखन केले असून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहे.सदस्य प्राध्यापक केंजळे मॅडम ह्या शिवाजी कॉलेज वडूज येथे मराठीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
या कार्यक्रमातील सदस्य नगरसेविका आरती काळे यांचं सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अनिता गोडसे यांची कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.पत्रकार मिलिंदा पवार यांचे कविता, लेख लिहिणे इत्यादी लेखन करत असतात त्यांचीही साहित्य मंडळामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी साहित्य मंडळाकडून पदाधिकाऱ्यांना नियूक्ती पत्र देण्यात आले
अध्यक्ष सीमा मंगरुळे यांनी नवीन कवी कवयित्री व साहित्यिकांना योग्य मार्गदर्शन व संधी मिळावी हा या मंडळाचा उद्देश असल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमांमध्ये वडूज मधील ज्येष्ठ विचारवंत सुरेश शहा व विनायक ठिगळे, प्रा. जेष्ठ साहित्यिक आवळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी कॉलेज वडूज च्या प्रा. डॉ सविता गिरी यांनी केले.