शिरूर – वडगाव रासाई (ता.शिरूर) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून म कृषी संवर्धन समितीच्या माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या तसेच आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार तीन दिवस उपोषणाला बसणार आहेत.
अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil)यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला राज्यातून मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून कुठे पुढाऱ्यांना गावबंदी तर कुठे निवडणुकीवर बहिष्कार असा पाठिंबा वाढत आहे त्यात आता महिलाही सहभागी होत असून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महीलाही त्यात अग्रेसर असून माजी सभापती सुजाता पवार यांनी वडगाव रासाई येथे श्री रामजी विविध कार्यकारी सोसायटी परिसरात दिनांक २८ ऑक्टोंबर ते ३० ऑक्टोंबर असे तीन दिवस अन्नत्याग उपोषण करणार आहे.