सणसवाडीचे ग्राम दैवत श्री काळ भैरवनाथ महाराजांचे घेतले दर्शन
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्त सदिच्छा भेट दिली यावेळी मराठा आंदोलनाच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांचे सणसवाडी करांनी रात्री उशिरापर्यंत वात पाहत अबालवृद्ध व माता भगिनींनी केलेले भव्य दिव्य जंगी स्वागत, गुलाब पुष्प हार,पुष्प वृष्टी व दिलेले प्रेम या अभूतपूर्व आठवणींना मनोज जरांगे पाटील यांनी उजाळा दिला.
शिरूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पण यामध्ये विशेष लक्षात राहिले ते उद्योगनगरी सणसवाडी करांचे स्वागत यावेळी रात्री उशिरापर्यंत पुणे नगर महामार्गावर माता भगिनी,अबालवृद्ध हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी अन्नदान, पाणी वाटप, फळे, तसेच मराठा आंदोलकांवर पुष्प वृष्टी करत जल्लोषात स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील यांना रात्री उशीर झाला यावेळी येथील स्वागत,पुष्पवृष्टी, गुलाब पुष्पहार आणि ग्रामस्थांचा उत्साह मनोज जरांगे पाटील यांनी अनुभवला होता.याचीच आठवण त्यांनी जागवत सणसवाडी ग्रामस्थांच्या प्रेमाबद्दल आभार मानत ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे रांजणगाव गणपती देवस्थानचे अध्यक्ष विजयराज दरेकर, सणसवाडीचे उपसरपंच राजेंद्र दरेकर, काँग्रेस शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, उद्योजक दगडू दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, उद्योजक नवनाथ दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे ल, दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे, उद्योजक नवनाथ रामचंद्र हरगुडे, माजी चेअरमन कैलास दरेकर, विठ्ठल दरेकर व इतर मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते