Friday, November 22, 2024
Homeस्थानिक वार्ताभैरवनाथ नगरच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी.

भैरवनाथ नगरच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी.


तळेगाव ढमढेरे प्रतीनिधी जालिंदर आदक
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील भैरवनाथ नगरच्या वेळनदी वरील कोल्हापूर पद्धतीच्या के टी बंधाऱ्याची दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने उपविभागीय शाखा अभियंता श्रीकांत राऊत यांनी पाहणी केली.
या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे लोखंडी ग्रील मागील पुरात वाहून गेल्याने विद्यार्थी प्रवास करत असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शाळा ,विद्यालय ग्रामप्रशानास केली होती. ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सन १९९८ च्या दरम्यान तयार करण्यात आल्याने या विभागाला बंधारा दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता.
त्यानुसार शुक्रवार (दि.१५) रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता यांच्या वतीने बंधाऱ्याची पाहणी केली व ग्रामपंचायतला सदर बंधारा हा पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हि योजना राबविण्यासाठी बांधण्यात आला असून योजना देखभाल दुरुस्तीसाठी बंधाऱ्यासहित ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच सदर बंधारा हा दुरुस्तीच्या कामगारांसाठी फ्लेट टाकणे,काढणे यासाठी असून स्थानिक नागरिकांच्या ये – जा करण्यासाठी नसून जीवितहानी होण्यापासून टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करण्याबाबत पत्र सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

भैरवनाथ नगरचा बंधारा लोकवाहतुकीसाठी नसल्याबाबतचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बंधारा नजीकच वाहतुकीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद,आमदार फंडातून किंवा इतर विभागातून नवीन पुलासाठी निधी मिळावा यासाठी मागणी व पत्रव्यवहार करणार आहे. -मच्छिंद्र भुजबळ, उपसरपंच तळेगाव ढमढेरे.


हा बंधारा लोकवाहतुकीसाठी नसून पाणी साठविण्यासाठी तयार केला आहे. देखभाल दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा पादचारी मार्ग आहे. ग्रामपंचायतच्या मागणीनुसार दुरुस्तीचे अंदाजपत्रक लवकरात लवकर ग्रामपंचायत प्रशासनास देणार असून पुढील कार्यवाही स्थानिक प्रशासन करेल.
-श्रीकांत राऊत,उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पुणे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!