दोघांचे वय १६ तर आईवडिलांना एकुलते एक मुले, मुलांच्या पाण्यात बुडण्याने कोरेगाव परिसरात शोकाकुल युक्त भीतीचे वातावरण
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील दोन किशोरवयीन मुले पाण्यात बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली असून अनुराग विजय मांदळे ( वय १६) व
गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) किशोरवयीन बुडाले असूनदोघेही आईवडिलांना एकुलते एक मुले होती. मुलांच्या पाण्यात बुडण्याने कोरेगाव परिसरात शोकाकुल युक्त भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहितीनुसार मुले भीमा नदीवर पिर साहेब मंदिरा लगत नदीकिनारी पोहायला गेली होती. यावेळी नदीच्या बंधाऱ्याचे ढापे उघडलेले होते त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरू होता यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे मित्र बुडाले यावेळी सोबत बारा पोहनारी मुले आरडाओरड करत ढेरंगे वस्ती कडे पळाली यावेळी तेथे भाजपचे तानाजी ढेरंगे, यांनी नदी पात्राकडे धाव घेतली तसेच यावेळी स्वप्नील भोकरे, संपत भांडवलकर , बापूसाहेब भांडवलकर, सोमनाथ अजगर, कचरू ढेरंगे, नानू निकम, रवी जाधव, दादा जाधव, मुलांचा पाण्यात पोहून शोध घेऊ लागले.त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
यावेळी सदर घटनेची माहिती पोलीस पाटील मालन गव्हाणे यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सदर बाबतीत शिक्रापूर पोलीस स्टेशनला लावले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार , पोलीस कॉन्स्टेबल अमोल रासकर व मंगेश लांडगे , ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, उद्याजक कृष्णा ढेरंगे, नारायण ढेरंगे यांनी महत्वपूर्ण सहाय्य केले . वाघोली अग्निशमन दल यांनी शर्थीचे प्रयत्न करत शोध कार्य केले याकामी उपस्थीत सर्व स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.
रात्री उशिरापर्यंत या मुलांचा शोध लागला नसून त्यांचा शोध घेण्याचे करत सुरू आहे.
सोळा वर्षांची किशोरवयीन दोन्ही मुले आईवडिलांना एकुलती एक असून एका मुलाचा सांभाळ वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केला आहे. त्यामुळे या माता पित्यांविषयी सहानुभूती व दुःख व्यक्त करण्यात येत आहे.