कोरेगाव भीमा – पाबळ ( ता.शिरूर) शिवाजी महाराजांच्या काळात रयतेच्या गवताच्या काडीलाही हात न लावण्याच्या प्रशासनाला दिलेल्या सूचना समाजात सुसंस्कारित नागरिक बनण्यासाठी सतत प्रेरणा देत होत्या आज आधुनिक काळात हे संस्कार कुमार अवस्थेतील मुलांसमोर ठेवणे गरजेचे असून मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर एकीकडे प्रचंड प्रगती केलेली आहे परंतु जंक फूड व मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीसमोर आहारापासून विचारांपर्यंत सुसंस्कार करणे व त्यांना मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे भविष्यातील या कार्यकारी लोकसंखेसाठी आजही शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन झी टॉकीज वरील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प नवनाथ महाराज माशेरे यांनी श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ येथे गणेशउत्सव काळातील व्याख्यानमालेत गणपती बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बोलताना केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश क्षीरसागर होते.
यावेळी उपप्राचार्य सुदाम पिंगळे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे, एकनाथराव बगाटे, राहुल गायकवाड, रोहिदास चौधरी, आनंदा गावडे, मच्छिंद्र खेडकर, अण्णा ओहोळ, निळकंठ पाटील, काळूराम गव्हाणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे विद्यार्थी विकास मंडळाचे अरुण निकम, अतुल लिमगुडे, संदीप गवारे, सुनील जाधव, किरण रेटवडे, देवा शेळके ,कैलास सिनलकर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधूभगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष क्षीरसागर यांनी केले तर आभार एकनाथ शिवेकर यांनी मानले.