पिंपरी येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षकांमधून प्राचार्य म्हणून सोहम मोरे याने, उपप्राचार्य विद्यार्थी शुभम सातपुते, पर्यवेक्षक कार्तिक देशमुख यांनी भूमिका यशस्वीपणे पार पाडली. या दिवशी संपूर्ण शाळा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेऊन सर्व नियोजन व्यवस्थितपणे पार पाडले. सर्व मुलांनी या विद्यार्थी शिक्षकांना सहकार्य केलं. पहिले चार तास घेतल्यानंतर शिक्षक दिन या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इ. १० वी अ.ब.चे वर्गशिक्षक साळवे सर व चव्हाण सर .सांस्कृतीक विभाग प्रमुख धायबर मॅडम यांनी पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अजित पाटील सर हे होते. पाटील सर यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर बोदडे मॅडम यांनी मनोगतात गुरूंचे महत्व आणि शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थांना विविध गोष्टी सांगून पटवून दिले. विद्यार्थी शिक्षकांमधून आदर्श़ शिक्षकांची निवड करण्यात आली.विद्यार्थ्यींनी अध्यापणाचे काम अतिशय उत्तमरित्या पार पाडले.
प्रथम क्रमांक-कु.सुकन्या काशेट्टी,व्दितीय क्रमांक-कु.सुचर्ण साठे, तृतीय क्रमांक-कु.सृष्टी कावळे,उत्तेजनार्थ-१)अनुश्री जगताप, २)अरुणा नडगे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलम वानखडे , सुचर्णा साठे आणि भक्ती देवणे या इ. १० च्या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्राची वाघमारे हिने मानले.