कोरेगाव भिमा – श्री क्षेत्र वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे मौजे बोल्हाई मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष तथा वाडेबोल्हाई पंचक्रोशी प्रसादिक दिंडीचे माजी सचिव कै.सीताराम(आण्णा) कोंडीबा गावडे(वय-९९) यांचे काल रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.कै.सीताराम(आण्णा) गावडे यांच्या जाण्याने वाडेबोल्हाई परिसरातील धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या अंत्यविधी वेळी वाडेबोल्हाई वाडेगाव गावठानातील वैकुंठ स्मशानभूमी येथे पार पडत असताना राजकीय, कृषी, धर्मक, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर. व पंचक्रोशीतील मोठा जणसमुदाय उपस्थित होता.वाडेबोल्हाई पंचक्रोशी प्रसादिक दिंडीचे खजिनदार गुलाब गावडे, वाडेबोल्हाईचे माजी आदर्श सरपंच कुशाभाऊ गावडे, प्रगतशिल शेतकरी काशिनाथ गावडे व शालन वाल्मीक केसवड यांचे ते वडील होते. तसेच वाडेबोल्हाईचे माजी आदर्श सरपंच दिपक गावडे व अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे अध्यक्ष अमोल गावडे यांचे ते आजोबा होते.
त्यांच्या मागे मुले, मुली, बहीण, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा गावडे परिवार वाडेबोल्हाईसह हवेली तालुक्यात सर्व क्षेत्रात सक्रिय काम करीत आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावडे परिवाराकडून वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सुरु केलेल्या ग्रंथालय, वाचनालयासाठी लागणारी सर्व क्षेत्रातील पुस्तके मोफत दिली जाणार असल्याचे त्यांचे नातू अमोल गावडे यांनी सांगितले.