पुणे जिल्ह्यातला सर्वात वेगवान किंग, सप्त हिंदकेसरी, सह्याद्रीकेसरी, १७ वर्षांचा योद्धा, खेड तालुक्याचा सार्थ अभिमान, राजुशेठ जवळेकरांचा “मन्याभाई” हरपला असल्याने बैलगाडा प्रेमिंवर दुःखाचा डोंगर कोसळला…
पुणे – महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी, मालक व शौकिनांसाठी अत्यंत दुःखदायक घटना घडली असून पुणे जिल्ह्यातला सर्वात वेगवान किंग, सप्त हिंदकेसरी, सह्याद्रीकेसरी, १७ वर्षांचा योद्धा, खेड तालुक्याचा सार्थ अभिमान, राजुशेठ जवळेकरांचा “मन्याभाई” हरपला असून अनेकांनी दुःखदअंतःकरणाने व्हॉटसअप व इतर समाज माध्यमांवर “मन्याभाई” भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
गाड्याचे मालक राजूशेठ जवळेकर यांचा मन्याभाई घाटात दाखल झाला अशी घोषणा व्हायची पाठोपाठ हलगी, डफडे,तुतारी आणि ताशाचा कडकडाट व्हायचा, मन्याभाई आला हे कानावर पडताच बैलगाडा प्रेमी घाटाकडे धाव घ्यायची, ज्याच्या नावाने बैलगाडा घाट लाखोंच्या संख्येने काठोकाठ पूर्ण भरायचा, अंगावर रोमांच उभा राहायचा,तो पाळायला लागला की मनाचा ठाव घ्यायचा,कोणीही क्षणभर पापणी लवू देत नव्हते, पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटायचे… भिर् झाली बारी…. आवाज ऐकत भंडाऱ्याची उधळण करत घाटात चैतन्य यायचे… शाब्बास रे पठ्ठ्या अशी कौतुकाची थाप मिळायची असा सप्त हिंदकेसरी, सह्याद्रीकेसरी, १७ वर्षांचा योद्धा, खेड तालुक्याचा सार्थ अभिमान, राजुशेठ जवळेकरांचा “मन्याभाई” हरपल्याने बैलगाडा शर्यतीतील सुवर्णकाळ हरपल्याने बैलगाडा प्रेमींनी अतोनात दुःखद शोक व्यक्त करत मन्याभाईला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती.
बैलगाडा घाटावर अबाधित साम्राज्य गाजवणारा मन्याभाई… ज्या वयात इतर बैलांना चालता-उठता येत नाही त्या वयात प्रत्येक घाटात स्वता:चे रेकॉर्ड करणारा, १२५ बाईक, ५ चारचाकी, १५०० पेक्षा जास्त फायनल खेळणारा, ८०० पेक्षा जास्त घाटात “घाटाचा राजा” किताब मिळवणारा व मन्या नुसता घाटात आला हे ऐकून बैलगाडा शौकीन लाखोंच्या संख्येने लोक ज्याची शर्यत पाहायला स्तब्ध उभे राहायचे, शर्यत पाहताना डोळ्याचे पारणे फिटायचे, बारी पाहण्यासाठी घाटामध्ये ३-४ लाख पब्लिक जमा होत होती आणि बारी झाल्यावर संपूर्ण घाट खाली होत होता “मन्याभाई” आता घाटात पळताना दिसणार नाही.ही बैलगाडा क्षेत्रासाठी अत्यंत दुःखदायक घटना घडली असून बैलगाडा क्षेत्रातील “मन्याभाई” हरपल्याने अनेकांना दुःख झाले आहे.
यावेळी बैलगाडा शर्यत प्रेमींनी , ” मन्याभाई घाटात यापुढे दिसणार नाही, हा विचार सुद्धा मनाला खुप त्रास देणारा आहे.जेव्हा कधी बैलगाडा क्षेत्रावर पुस्तक लिहिले जाईल तेव्हा पहिला धडा तुझ्या नावाचा असेल वाघा…बैलगाडा क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई अशी श्रद्धांजली वाहिली.
चिंचोशिचे माजी सरपंच नारायण मोरे, कृष्णा ढेरंगे, प्रदीप काशिद, दिपक गव्हाणे, स्वप्निल गव्हाणे, नाशिर इनामदार, विकी गव्हाणे, कांताराम कडलक, विश्वास गव्हाणे यांनी दुःखद शोक व्यक्त केला.
बैल जोपासण्याची किमया जवळेकर बंधुकडे – मागील ४० वर्षांपासून बैलगाडा स्पर्धा जोपासणारे खेडचे माजी सभापती राजूशेठ जवळेकर ,बाळासाहेब जवळेकर या बंधूंची बैलगाडा प्रेम अवघ्या पुणे जिल्हासह महाराष्ट्राला परिचित असून बैलगाड्यावर अतोनात प्रेम करणारे कुटुंब असून “आनंद्या ” हा जुना बैल एकेकाळी घाटाचा राजा होता.आता वृद्ध अवस्थेत असल्याने त्याला सांभाळत असून त्याच्याच तालमीत तयार झालेला मन्याभाई यानेही बैलगाडा क्षेत्रात नावलौकिक मिळवला या क्षेत्रात सुवर्णकाळ आणला. जवळेकर बंधूंची बैलांवर खूप प्रेम असून बैलाची निगा राखत त्याला जोपासण्याचे व जीव लावण्याचे काम जवळेकर बंधू करत आहेत.
https://www.instagram.com/reel/C3y_lwXIWD4/?igsh=MzRlODBiNWFlZA==
बैलगाडा क्षेत्रातील अतिशय गाजलेला व सर्वांच्या काळजाचा ठोका असणारा मन्याभाई हरपला हे मनाला अत्यंत दुःख देणारे असून बैलगाडा क्षेत्रातील सुवर्णकाळ हरपला असून असा विक्रमवीर पुन्हा होणे नाही.- माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर , बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र केसरी ‘सैराट’