राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलनात एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये सक्रिय सहभागी .
कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.हवेली) भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सर्व शिक्षेकातर कर्मचारी हे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलनात एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये सक्रिय सहभागी होत आपला पाठिंबा व्यक्त केला.
शासनाने शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर सातव्या वेतन आयोगात केलेल्या अन्यायाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. या आंदोलनाला पुणे जिल्हा स्पुक्टो चे अध्यक्ष व अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड, बी.जे. एस. कॉलेज स्थानिक स्पुक्टो शाखेचे अध्यक्ष डॉ. देविदास पाटील, अभ्यास मंडळ सदस्य मा. डॉ. ज्योतीराम मोरे, डॉ. भूषण फरतडे, स्थानिक शाखा सचिव प्राध्यापक शिवाजी सोनवणे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
सदर आंदोलन रास्त मागण्यासाठी आहे. सर्वांनी एकजुटीने आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी लढा अधिक तीव्र केला पाहिजे असे यावेळी मत व्यक्त करण्यात आले. स्पुक्टो स्थानिक शाखा व पुणे जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संपास पाठिंबा मिळाला. सदर पाठिंब्याचे पत्र मुख्य लिपिक श्याम पाटील, वरिष्ठ लिपिक गिरीश शहा, कनिष्ठ लिपिक बाजीराव आवटे रंगनाथ गुरव यांनी स्वीकारले