कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.हवेली) भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग व युवा पर्यटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजादी का अमृत महोत्सव प्रसंगी ‘हर घर तिरंगा’ अभियान संपन्न झाले .अभियानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपस्थितांनी प्राचार्य संजय डॉ संजय गायकवाड यांनी, ‘अभियागांतर्गत भारत सरकारने सर्व नागरिकांना त्यांच्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले असून आपण देशाचे प्रथम जबाबदार नागरिक आहोत हे समजून प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकविला पाहिजे.’ अभियानाच्या प्रारंभी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उमाजी नाईक यांच्यापासून नारायण दाभाडे यांच्यापर्यंत अनेकांनी प्राणाची आहुती दिलेल्या क्रांतीवीरांची माहिती इतिहास विभाग प्रमुख डॉ. भूषण फडतरे यांनी दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून भारत सरकारच्या ऑनलाइन वेबसाईटवर अपलोड करण्यास प्राधान्य दिलेकार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमातील पंच-प्राणची शपथ घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भूषण फडतरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सचिन कांबळे यांनी तर आभार डॉ. एस. व्ही. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. रमेश गायकवाड, डॉ.माधुरी देशमुख,प्रा. समीर मोरे, प्रा.चक्रधर शेळके उपस्थित होते.