कोरेगांव भिमा (ता.शिरुर) श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने बालदिनाच्या औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री छत्रपती सभजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य कुंभारकर बालकाना दर्जेदार शिक्षणा बरोबर सुसंस्काराची जोड हवी असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य कुंभारकर यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो यातून बालकांचे महत्व अधोरेखित होते. आई वडील मुलांसाठी किती कष्ट घेतात या पेक्षा संस्कार काय करतात यास महत्व आहे. तुमचा दिवसातील प्रत्येक क्षण मुलांसाठी महत्वाचा आहे.
प्रारंभी श्री हनुमान ची आरती मान मुलांना देण्यात आला .दहावी बारावी प्रथम आलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, बबनराव गव्हाणे , अप्पासाहेब फडतरे, सुनिल सव्वाशे, सुनिल नांदगुडे, रामदास गव्हाणे, विजय देशमुख, मारुती धुमाळ, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार व शिरुर – हवेली प्रासादिक दिंडीचे सचिव के. डी. गव्हाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, सतिश जंगम यांनी आभार मानले.