पुस्तक प्रदर्शनाला “डॉ बी आर आंबेकर विस्डोम बुक फेअर” असे नाव देत अनोखे पुस्तक प्रदर्शन
कोरेगाव भिमा – पेरणे फाटा (ता.हवेली) येथील १ जानेवारी २०२४ या २०६ व्या अभिवादन सोहळ्याच्या तयारी निमित्त बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी करत सोहळ्या विषयी माहिती देत तयारीचा आढावा घेतला. यावेळी सुनील वरे यांनी बार्टीच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारी बाबत माहिवती दिली. वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात येत आहे बसेस संख्या वाढवण्यात आली असून पार्किंग चाळीस पेक्षा जास्त असून पाणी, स्वच्छतागृह यांची संख्या वाढवण्यात आली असून आलेल्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केले आहे.
बुक फेअरचे आयोजन करण्यात आले असून २४६ बुक स्टॉल वितरीत करण्यात आले आहे.डॉ बी आर आंबेडकर विस्डोम बुक बुक फेअर असे नाव देण्यात आले असून १९२३ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकोनॉमी यांनी डॉकटर ऑफ सायन्स ही पदवी “प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन” ग्रंथाला शंभर वर्ष होत असून हा बुक फेअर चा थीम राहिला असून हा ग्रंथ व त्यातील विचार जास्तीत जास्त अनुयायांपर्यंत पोचावेत यासाठी फोटो झिंको यांच्याकडून विशेष प्रिंटिंग केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांच्यावरील ग्रंथ मोठ्या प्रमाणात छापलेले असून घटनेची उद्देशिका यांची प्रिंट केली असून अनुयायांना कोणत्याही परिस्थितीत पुस्तकांची कमी पडणार नाही यासाठी प्रयत्नशिल असून हा शौर्यदिन हा सर्वांसाठी विजयोस्तव साजरा करणारा मनामनात बाबासाहेबांचे विचार पेरणारा असेल अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. यावेळी बार्टी चे प्रसिद्धी प्रमुख डॉ सत्येंद्र चव्हाण उपस्थित होते.