मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची बहिणीच्या प्रेमाला अनमोल साथ किडनी प्रत्यारोपनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केली मदत
कोरेगाव भीमा – करंदी ( ता.शिरूर) येथील बहिणीने भावाला दिवाळीच्या भाऊबीजेच्या सणाच्या दरम्यान बहिणीने भावाला किडनी देत भाऊरायाला दिली अनोखी भाऊबीजेची अविस्मरणीय भेट दिली असून याकामी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अनमोल मदत मिळाली असल्याने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
बहीण भावाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कथा आपण आजवर कथा-कादंबऱ्या, नाटक, चित्रपटाच्या माध्यमातून वाचल्या, काही काव्य ,गाणीही ऐकली किंवा पहिली असतील. अशीच बहीण भावाच्या नाते संबंधातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट घडली आहे शिरूर तालुक्यातील करंदी येथील बाळासाहेब बबन ढोकले यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या यावेळी त्यांना किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे होते अशावेळी त्यांच्या मदतीला धावून आली ती रंजना विजापुरकर महानुभाव ही बहीण तिने भावाला किडनी डोनेट करण्याचे ठरवले व आपला विचार कुटुंबात सांगितला त्यानुसार त्यांनी तयारी केली पण दवाखान्याच्या खर्चाचे काय ? असा मोठा प्रश्न या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबापुढे उभा राहिला. शस्त्रक्रियेचा खर्च साधारण १० लाखांच्या दरम्यान होता व एका सर्वसामान्य कुटुंबाला तो न झेपणारा खर्च होता. अशावेळी त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधत आपली समस्या सांगितली यावर माजी खासदार आढळराव पाटील यांनी तातडीने आपले पत्र बनवून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला व संबधित शेतकरी कुटुंबाला मदत मिळवून दिली.
मुख्यमंत्री निधीतून सहाय्यता मिळाल्याने संबधित बाळासाहेब ढोकले यांना कोइमतूर येथील कोबाई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल लिमिटेड येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
बहीण-भाऊ एकमेकांची रक्षा करण्याचं वचन देतात. हेच वचन खऱ्या अर्थाने निभावलं एका बहिणीने. जिने आपल्या भावाचा जीव वाचवला आहे. सर्जरीची भीती वाटणाऱ्या या बहिणीने भावासाठी न घाबरता आपल्या शरीरातील किडनी त्याला काढून दिली.बहिणीने आपली किडनी भावाला दान करत त्याला नवं आयुष्य दिलं आहे. भाऊबीजेच्या सणाचे सर्वात अमूल्य आणि अनोखं असं गिफ्ट बहिणीने भावाला दिलं आहे.