माजी उपसरपंच संजय दिनकर शितकल व रोहिदास शितकल, मयूर शितकल, सोनू शितकल यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन
कोरेगाव भीमा – बकोरी (ता.हवेली) येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात येऊन प्रबोधन करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जपत जयंती साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम माजी उपसरपंच संजय दिनकर शितकल,रोहिदास शितकल, मयूर शितकल, सोनू शितकल यांनी राबवला.
आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी विचार व्यक्त केले तर प्रबोधन केंद्र पेरणे फाटा येथील उत्तमराव भोंडवे यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवनातील खडतर प्रसंग , विद्यार्थ्यांनी आई वडील,गुरुजन व ज्येष्ठ व्यक्तींच्या विचार व मार्गदर्शनानुसार वाटचाल करा व आपल्या जीवनाला आकार द्या असे मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच सत्यवान गायकवाड,उपसरपंच दत्तात्रय वारघडे,प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे, माजी सरपंच सुभाष वारघडे,माजी उपसरपंच शांताराम वारघडे, माजी उपसरपंच नामदेव वारघडे, तंटामुक्ती अध्यक्ष पंडित वारघडे, रामदास वारघडे, केरबा वारघडे, माहिती सेवा समिती महाराष्ट्र प्रदेशचे प्रल्हाद वारघडे, जलमल्हार सोसायटीचे चेअरमन संजय वारघडे, मुख्याध्यापक गायकवाड सर व डी. बी.धावरे सर होते.