कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, जय जिजाऊ जय शिवराय…. जय जय भवानी- – जय जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय….. अशा विविध जयघोषत फ्रेंड्स एज्युकेशन इंस्टीट्युट संचालित फ्रेंड्स नर्सरी / प्रायमरी / सेकंडरी स्कुल, कोरेगाव भिमा,( ता. शिरूर) या शाळेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
फ्रेंड्स एजुकेशन इन्स्टीट्यूट कोरेगाव भिमा संस्थेचे सचिव दिलीप भोसले व उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची पुजा करण्यात आली व वाजत गाजत महाराजांच्या प्रतिमेची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. संस्थेचे सचिव दिलीप भोसले, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे व शाळेचे मुख्याध्यापक मदन हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक कोरेगाव बाजार मैदान ते शाळा अशी काढण्यात आली. त्यानंतर शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त राजेंद्र गव्हाणे उपस्थितीत होते.शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शिवचरित्रावरील भाषणानंतर शाळेचे शिक्षक शंकर बोरकर सरांनी छत्रपती शिवरायांचा चरित्राचा वैज्ञानिक दृष्टीकोनातुन इतिहास उलगडविला तर शाळेचे मुख्याध्यापक मदन हराळ यांनी शिवरायांचा कष्टकरी मावळ्यांचा प्रामाणिकपणा मार्गदर्शन केले.यानंतर संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना शिवजयंतीतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपले आयुष्य यशस्वी व गुणसंपन्न, चरित्र्यसंपन्न बनवले पाहिजे. जेवढा तुमचा संघर्ष मोठा होईल तेवढाच तुमचा विजय निश्चित होईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती झगडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मदन हराळ यांनी मानले यावेळी उपमुख्याध्यापिका नायर अजिमा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.