यावर्षी सरलष्कर दरेकर घराण्याचा रथ सहभागी होण्याचा मान
आंबळे ( ता.पुरंदर ) येथील मूळ निवासी तसेच शिरूर तालुक्यातील सणसवाडी ,दरेकरवाडी,करंदी, मांडवगण फराटा ,हवेली तालुक्यातील वढू खुर्द, बारामती तालुक्यातील वडगाव, अहमदनगर श्रीगोंदा येथील वंशज या सोहळ्यात होणार सहभागी
पुणे – शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा पर्व १२ वे मध्ये ९१ स्वराज्यारथांची भव्यदिव्य मिरवणूक सोहळा होणार असून. छञपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या घराण्यांनी स्वराज्यासाठी त्याग,बलिदान करत शौर्य गाजवले व स्वराज्य उभारणीत आपले योगदान दिले त्यांचा स्वराज्यरथ सहभागी होणार असून यावेळी आंबळे ( ता.पुरंदर ) येथील मूळ निवासी असलेले व सध्या पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातील सणसवाडी ,दरेकरवाडी,करंदी, मांडवगण फराटा ,हवेली तालुक्यातील वढू खुर्द, बारामती तालुक्यातील वडगाव, अहमदनगर श्रीगोंदा येथील वंशज या सोहळ्यात सहभागी होणार असून स्वराज्यरथ मिरवणुकीत ६९ व्या क्रमांकाचा रथ सरलष्कर दरेकर घराण्याचा स्वराज्य रथ सहभागी होणार आहे. लालमहाल येथे पाळणा तर एसएसपीएमएस शाळा पुणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा यांच्या पुतळ्यावर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी सोहळा होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योगमंत्री नामदार उदय सामंत, खासदार सुप्रीयाताई सुळे, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक,आमदार दिलीप मोहिते, आमदार संग्राम थोपटे,आमदार शशीकांत शिंदे,आमदार संजय जगताप ,आमदार सिध्दार्थ शिरोळे, बीव्हीजी उद्योगसमूहाचे हणमंत गायकवाड,पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे संदीप गिल्ल ,ॲड. प्रतापदादा परदेशी व ९१ स्वराज्य रथ घराण्याचे वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.