शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कोरेगांव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त महिला व बालविकास क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या महिला भगिनींना शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने मंगल सासवडे, वैशाली खेडकर, नंदा भुजबळ, ज्योती पाटील सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती सरपंच रमेश गडदे यांनी दिली.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अशा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने ९ मे २०२३ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आला होता.
यानुसार शिक्रापूर ग्राम ग्राम पंचायतीच्या वतीने संबधित पुरस्कार कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन २०२३ – २०२४ मंगल सासवडे, वैशाली खेडकर, नंदा भुजबळ, कुमारी ज्योती पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे, ग्राम पंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, उषा राऊत, माजी ग्राम पंचायत सदस्य मनीषा चव्हाण, शिव व्याख्याते शरद दरेकर, उद्योजक अंकुश घारे, सतीश सासवडे, सचिन करंजे, स्वप्नील मांढरे,अंगणवाडी सेविका सीता मिसाळ, ,संगीता खरपुडे, सरस्वती लांडे, लता गायकवाड, , आशा सेविका कल्पना ढोकले, सीमा भाऊसार, सुरेखा राधवण, रीना सोनवणे, छाया कळमकर, संगीता तावरे, सुमन माने, प्रभात संघाच्या जयश्री पाटील व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.