सरलष्कर दरेकर यांचे वंशज पुणे जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने उपस्थित
श्री छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पुण्यात अवघे स्वराज्य अवतरले होते. भगवे फेटे त्याला सोनेरी किनार, पारंपरिक वेशभूषा, कपाळावर भगवा टिळा, मराठमोळा पोशाख आकर्षक फुलांची सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९१ स्वराज्यरथ… प्रत्येक घराण्याच्या त्यागाचा ,शौर्याचा व बलिदानाचा जणू एक ऐतिहासिक प्रसंगच समोर येत होता, ५१ रणशिंगांची ललकारी….. नादब्रह्म ढोलताशा पथकाचा रणगजर…. महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… आकाशात जशी वीज लखलखनारे तलवारीचे , दांड पट्ट्याचे पाते चमकत होते, …सनई-चौघडयांचे मंगलमय सूर…. हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनःश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला होता आणि याचे साक्षीदार ऐतिहासिक पराक्रमाचे वारसदार अनुभवत होते.
शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहालापासून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. मिरवणुकीचे उद्घाटन शिवरायांचे वंशज आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊशहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करण्यात येऊन झाले.
या नेत्रदीपक सोहळ्यामध्ये अटकेपार झेंडा फडकवणारे पानिपत वीर मानाजी पायगुडे यांच्या पुतळ्याचे तसेच सरनौबत येसाजी कंक यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. पराक्रमी व गौरवशाली शिवकालीन युध्दकला सादर करणा-या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर करण्यात आल्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या जल्लोषपुर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध होऊन उत्साह संचारला.
या सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, संजूभाऊ पासलकर, समीर जाधवराव, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.
यावेळी सरलष्कर दरेकर यांचा ६९ वा स्वराज्य रथ सहभागी झाला होता. आंबळे ( ता.पुरंदर ) येथील मूळ निवासी असलेले व सध्या पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातील सणसवाडी ,दरेकरवाडी,करंदी, मांडवगण फराटा ,हवेली तालुक्यातील वढू खुर्द, बारामती तालुक्यातील वडगाव, अहमदनगर श्रीगोंदा येथील वंशज या सोहळ्यात सहभागी होणार असून स्वराज्यरथ मिरवणुकीत ६९ व्या क्रमांकाचा रथ सरलष्कर दरेकर घराण्याचा स्वराज्य रथ सहभागी झाला होता.
यावेळी सचिन दरेकर, प्रशांत दरेकर, निलेश बाळकृष्ण दरेकर ,अश्विनी दरेकर, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, नामदेव दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर , उद्योजक रामदास दरेकर,प्रशांत दरेकर, निलेश दरेकर , सुनील दरेकर , माजी सरपंच तुकाराम दरेकर ,मोहन दरेकर , काळूराम दरेकर , बाळासाहेब दरेकर ,भाऊसाहेब दरेकर ,मयूर दरेकर ,निखिल दरेकर, विक्रम दरेकर राजेंद्र दरेकर, सरपंच दरेकरवाडी, दादा दरेकर व समस्त दरेकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.