पुणे जिल्ह्यातील इंदापूर , बारामती , दौंड , शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून सुट्टी जाहीर
पुणे – दिनांक १३ जुलै
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील चार तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेच्या तसेच इतर सर्व पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.
पुणे जिल्ह्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व यामध्ये प्री स्कुल , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक सर्व शाळांना सुट्टी जाहीरकरण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर , बारामती , दौंड , शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र , पुणे यांचेकडील संदेशान्वये दिनांक १४ व दिनांक १५ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा दिला आहे .
पुणे जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता सदर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असलेने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता पुणे जिल्ह्यातील इंदापूर , बारामती , दौंड , शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून इतर सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या प्री स्कुल , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक सर्व शाळांना दिनांक १४ ते शनिवार दिनांक १६ पर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
तसेच सदर कालावधीमध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्था करणेचे आहे . असा आदेश देण्यात आला आहे.