Sunday, September 8, 2024
Homeताज्या बातम्यापिंपळे जगताप, वाजेवाडी गावांचा बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रामधे समावेश करण्यात यावा -...

पिंपळे जगताप, वाजेवाडी गावांचा बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रामधे समावेश करण्यात यावा – चंदन सोंडेकर 

पुणे – राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते  चंदन सोंडेकर यांच्या विनंती पत्रावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रामधे (शिरुर – हवेलीतील) पिंपळे जगताप,  वाजेवाडी या गावांचा समावेश करण्याबाबत पत्र देण्यात आले होते.

  जिल्हाधिकारी  सुहास दिवसे यांनी २६ जुन२०२४  रोजी जुन्नर,  आंबेगाव,  खेड आणि शिरुर तालुक्यातील २३३ गावांचा “बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” यामधे समावेश केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची  भेट घेऊन शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघातील पिंपळे जगताप व वाजेवाडी या गावांत बिबट्यांचा वावर असून त्यांपासून नागरिकांच्या व पशुधनाच्या जिवीतास धोका असूनही या गावांचा बिबट प्रवण क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी बिबट हल्ला घटना घडलेली गांव वगळली असल्याचे निदर्शनास आणून लक्ष घालण्याची विनंतीपत्र दिले होते. 

 यावेळी   पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरुण गिरे ,  शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप, वाजेवाडी विकास सोसायटी व्हॉईस चेअरमन नवीन सोनवणे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!