महाराष्ट्र राज्यात RTE अंतर्गत ९ लाख जागा
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या आरटीई या योजनेअंतर्गत मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याला १६ एप्रिल पासून सुरवात झाली आहे. पालकांना त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० एप्रिल पर्यंत भरता येणार आहे.१६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत पालकांना आपल्या पाल्याचे आरटीई अतंर्गत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
हे अर्ज भरण्यासाठी पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात RTE अंतर्गत ९ लाख जागा उपलब्ध आहेत.
आरटीई योजना – RTE ही देशभरात मुलांच्या शिक्षणासाठी राबविली जाणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सरकारी शाळांमध्ये सर्व मुलांना मोफत शिक्षण देण्याचा तसेच खाजगी शाळांनी त्यांच्या शाळेत किमान २५% मुलांना कोणत्याही शुल्काशिवाय प्रवेश द्यावा अशी तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायदा (RTE) अधिनियम, २००९ अंतर्गत विविध तरतुदी करण्यात आल्या जेणेकरून शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांना नियमित शिक्षण घेता यावे त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा. २००९ च्या याच कायद्यात १२ एप्रिल २०१२ रोजी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बदल करण्यात आले. कोर्टाच्या निर्णयानुसार खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या शाळांसह प्रत्येक शाळेला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्वरित मोफत शिक्षण देण्याचे निर्देश दिले. या आदेशानुसार बालकांना इयत्ता-1 ते १४ वर्षांचे होईपर्यंत मोफत शिक्षण घेता येणार आहे. प्रत्येक मान्यताप्राप्त शाळा प्राथमिक शिक्षण देत असली तरीही ती विनाअनुदानित शाळा असली तरीही तिचा खर्च भागवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत किंवा अनुदान मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूच्या वंचित मुला-मुलींना प्रवेश देणे बंधनकारक आहे.
- २५% मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –
- बालकांचे जन्म प्रमाणपत्रबालकांचे आधार कार्ड
- पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- पालकांचे आधार कार्ड
- बालकांचे दोन फोटो
- अपंगत्व आल्यास प्रमाणपत्र
RTE अंतर्गत अशी निवड शाळा -तुमचा रहिवासी पुरावा असलेल्या आधार कार्ड वरील पत्त्यापासून चारही दिशांना एक किलोमीटर ते तीन किलो मीटरच्या आतमधील शाळांची सुची पहावी.आपल्या सोयीनुसार शाळेला प्रथम, द्वितीय व तृतीय असा क्रम द्यावा.तसेच आपल्या परिसरातील सात तेआठ शाळाची सुची नमूद करावी.