पर्यटन निधी २००९ पासून असून पाणी प्रश्न या बाबत नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन यांनि घेतली भेट
मोराची चिंचोली -मोराची चिंचोली (ता. शिरूर) हे गाव राष्ट्रीय पक्षी मोरांच्या अस्तित्वासाठी ओळखले जाते. यासाठी शासनाने चालू केलेला पर्यटन निधी हा २००९ पासून बंद झाला आहे. व पाणी प्रश्न या बाबत नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन चिंचोली मोराची यांनी जेष्ठ समाजसेवक पदमश्री अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेऊन चर्चा केली.
मोराची चिंचोली हे गाव सातत्याने दुष्काळ ग्रस्त असून पाणी टंचाई कायम स्वरूपी आहे. या गावात मोरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात पर्यटक येत असतात. या बाबतचा २००९ पासून पर्यटन निधी बंद झाला आहे. शासनाकडे ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या बाबत लक्ष घातले नाही. घरातल्या मुलांना जपावे तशी गावकरी मोराची काळजी घेत असून अन्न, पाणी नसल्यामुळे काही मोरांचे स्थलांतरित झाले आहे. पुढील काळात अशीच परिस्थीती राहीली तर मोरां सोबत ग्रामस्थ पण स्थलांतरित होतील .या शिवाय शेतीसाठी पाणी, पिण्यास पाणी या समस्या आहे. शेती करीता पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागते. चिंचोलीच्या जवळच्या परिसरात अवघ्या काही अंतरावर दोन्ही बाजुला चास कमानधरणाचे पाटाचे पाणी जाऊन सुध्दा गावला त्याचा फायदा होत नाही. पावसाळा सोडला तर पिण्यास ही पाणी नसते. या पाटाचे पाणी गावाला उपलब्ध व्हावे यासाठी अण्णा हजारे यांच्याशी माजी सैनिक शामराव धुमाळ व फाऊंडेशन चे कार्यकर्ते यांनी भेट घेऊन चर्चा केली. या बाबत अण्णांनी लक्ष घालावे अशी विनंती केली. या बाबत अण्णा हजारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले