ऊर बडवून रडतेय आई अन् आज्जी तर पाठीराखा हरवल्याने हृदय पिळवटून टाकणारा दिदीचा आक्रोश …धायमोकलून रडतायेत आजोबा आणि हमसून हमसून रदातायेत बाबा…
आबा पोराचा अपघात झालाय…. पोरगं काहीच बोलत नाही.. उभ रक्तान माखलय.. निपचित पडलय..लवकर या.. गरबडीने पोचलेल्या बापाच्या डोळ्यासमोर आत्ताच मिसुरड्या फुटायला लागलेल्या कोवळ्या लेकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता… शरीराचा चेंदा मेंदा झाला होता. ज्या लेकराला साधा काटा टोचू नये यासाठी जिवाचं रान करणाऱ्या बापाच्या डोळ्यासमोर लेकाचा देह रस्त्यावर वाळूसारखा विखुरला होता.. माती गोळा करावा तसा पोटच्या पोराचा रक्तमासाचा देह गोळा करावा लागला… काय ते दुर्दैव…..
नुकतीच दहावीची परीक्षा झाली होती. जरा मोकळीक मिळाली म्हणून दादया पार हुरळून गेला होता.घरात असणारी श्रीमंती सर्वांचा लाडका असणाऱ्या दाद्याला गाड्यांची मोक्कार हाऊस असल्याने बापाने स्पोर्ट बाईक घेऊन दिली होती. कमी वेळात व कितीही ट्रॅफिक असले तरी दादया वेळेत येणार घरी पोचणाऱ्या दादयाच्या वेगात गाडी चालवण्यावर शेजारचे काका, वडिलांचे मित्र इतकाच काय तर शिक्षकांनीही घरच्यांना सावध केलं पण त्यांचं एकच उत्तर पोरगं गाडी व्यवस्थित चालवत पण या वयात थोडी फार जोरात चालणारच की ? सांगतोय त्याला पण ऐकत नाही .. काय करावं… अस म्हणून हसण्यावारी न्यायची सवय बापाला लागली होती.
गुढीपाव्याचा दिवस घरात सगळी कडे आनंदाचे वातावरण, अंगणात सर्व गाड्या पुजलेल्या, पाटाभोवती आकर्षक रांगोळी काढलेली, त्यावर उभारलेली बांबूवर आईच्या आवडत्या रंगाची साडी गुढीला बांधलेली, त्यावर पांढरी शुभ्र साखरेची घाटी, वाऱ्याशी स्पर्धा करणारा हिरवा लुसलुशीत लिंबाचा पाला, त्यावर चमकणारा तांब्या यामुळे वातावरण भारावून गेले होते. दारात वेगवेगळ्या महागड्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या, नवीन कपडे, स्वयंपाक घरात चाललेला आवडीचा स्वयंपाक, भजे तळणारी आजी, पोळ्या करणारी आई तर श्रीखंड व गोड पदार्थ बनवणारी ताई यामुळे स्वयंपाक घरात खाद्य पदार्थांचा सुवास दरवळत होता…दादा सकाळी मित्राला भेटायला आला होता आईने नको जाऊ म्हणून हट्ट केला..दिदिने चावी लपवली तर आजीने तुझ्या आवडीच जेवण केलं सोन्या चार घस खाऊन बाहेर जा असा लडिवाळपणा करत नातवाच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितले पण. आइकन तो दादया कसला..
दहावी झाल्यावर चांगल्या शाखेत प्रवेश घेऊन उज्वल करियर करायचे असे डोक्यात असलेल्या दादयाला गाड्यांची भारी आवड.. अभ्यासात हुशार आणि स्वभावाने शांत असणारा दादयाला स्पोर्ट बाईक हातात आली की सगळ्यांचा विसर पडायचा. दादयाला जाऊन तीन तास झाले तरी येईना म्हणून भूक लागलेल्या दिदीने रागाने फोन केला. दादया जेवायला जेवायला ये सर्वजण वाट पाहत आहे हे सांगायला पण त्याने फोन घेतला नाही.. मेसेज करून सांगितले तरी रिप्लाय नाही..स्वयंपाक होऊन बराच वेळ झाला तरी दादया काही येईना.. आई ,बायको आणि दिदीच्या कुरबुरिकडे दुर्लक्ष करत आबांनी येइल तो लवकर उगाच कशाला गरबड करताय.. गुढी व गाड्या पूजन करून सोफ्यात आरामशिर बातम्या पाहत बसलेल्या वडिलांचा फोन वाजला ……
आबा कुठे आहात… काय रे काय झालं ??? समोरून घाबरलेल्या आवाजात आभाळ कोसळणारे .हृदय पिळवटून टाकणारे शब्द आबांच्या कानात गरम शिसे ओतावे असेच होते… आबा पोराचा अपघात झालाय…. पोरगं काहीच बोलत नाही.. उभ रक्तान माखलय.. निपचित पडलय..लवकर या.. गरबडीने पोचलेल्या बापाच्या डोळ्यासमोर आत्ताच मिसुरड्या फुटायला लागलेल्या कोवळ्या लेकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता… .मोठा साहेब करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या बापाला लेकाचा मृतदेह पाहून मोडून पडला होता.. ज्या लेकाला काटा टोचू नये यासाठी जिवाचं रान करणारा बाप लेकाच रस्त्यावर विखुरलेले शरीर हाताने ओंजळीत गोळा करत धाय मोकलून रडत होता. शरीराचा चेंदा मेंदा झाला होता. ज्या लेकराला साधा काटा टोचू नये यासाठी जिवाचं रान करणाऱ्या बापाच्या डोळ्यासमोर लेकाचा देह रस्त्यावर वाळूसारखा विखुरला होता.. माती गोळा करावा तसा पोटच्या पोराचा रक्तमासाचा देह गोळा करावा लागला… काय ते दुर्दैव….. पोटच्या पोराला अस पाहून बापाच्या हृदयाचा बांध फुटला धाय मोकलून रडणाऱ्या बापाला… काहीच सुचत नव्हतं.. एकलत एक गुणच पोर आज सोडून गेलं होत..
मित्रांनी पोराचा मृतदेह अँब्युलन्स मध्ये नेला..घरी गेल्यावर आई,बायको आणि पोरीला काय उत्तर द्यायचं… आपला दादया अपघातात गेलाय हे कोणत्या तोंडाने सांगायचं… एव्हाना घरच्यांना कल्पना आली होती..आई,ताई आणि आजीने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला …पोस्टमार्टम होऊन सायंकाळी मृतदेह घरी आला… काय तो दैवदुर्विलास…नवीन वर्षाची सकाळी उभारलेली गुढी उतरवण्याआधी दुर्दैवी बापाला लेकाची तिरडी बांधावी लागत होती.आरोग्यासाठी कडू लिंबाचा घास साखरेच्या घाटी बरोबर खाण्याच्या ऐवजी सुटकेचा कडू घास काढावा लागला होता…
बहिणीचा आयुष्यभराचा आधार तर आज्जी बाबांचा लाडका नातू हरपला होता… आईबापाचा जीवन जगण्याची उमेद संपली होती.त्याच्या मृत्यू बरोबर यांचेही प्राण हरपले होते… उरला होता फक्त देह.. ज्यात कसलीच जगण्याची उमेद नाही…आता दरवर्षी कुटुंबाला पाडवा अपघाताची आठवण देत राहील… आपण मुलांची हौस नक्कीच करायला हवी..पण जिवावर बेतनारी आणि कुटून उद्ध्वस्त होईल अशी हौस नाही पुरवली तर काय होईल… होयद्या त्याला सज्ञान… मग चालवू द्या वाहन… वाहन जरी महाग असले तरी जीवन अनमोल आहे…