धानोरे (ता.शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी बापूसाहेब रामदास भोसुरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली.
चेअरमन तिरसिंग सुभाष जवळकर यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त झालेल्या जागेची निवडणूक घेण्यात आली.यावेळी बापूसाहेब रामदास भोसरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब धायगुडे व रुपेश शीलवंत यांनी जाहीर केले.
यावेळी तीरसिंग जवळकर,बाबू गायकवाड, ज्ञानेश्वर थेऊरकर,मोहन कामठे, ऋषिकेश ढमढेरे,आशुतोष ढमढेरे,शालन दरेकर,चंद्रभागा तनपुरे,संचालक उपस्थित होते