कोरेगाव भीमा. – ता.२१ मार्च
जिंदा शहीद म्हणून परिचित असलेले व शरीरात हाडांपेक्षा जास्त रॉड असलेले अखिल भारतीय दहशतवाद विरोधी संघटना अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा यांनी १९८५ पासून भारत मातेचा झेंडा घेऊन कार्यरत आहे. इथल्या मातीत पराक्रम व त्याग आहे.महाराष्ट्राची धरती वीर पुरुषांची आहे. छञपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव आले की रक्त उसळले जाते धर्मासाठी भारत मातेच्या संरक्षणासाठी व बलिदानासाठी जवान तत्पर असतात.बाबर औरंगजेब काफर होते आहेत राहतील. गुरू गोविंद सिंग व त्यांच्या दोन मुलांच्या त्यागाचा व बलिदान सांगत छञपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा इतिहास जगात पोचवायचा आहे . पुढील पिढ्यांना आदर्श ठेवायचा आहे असे मत व्यक्त केले.
औरंगजेबाने राज्यासाठी भावांचा खून तर वडिलांना कैदेत तर मुलांना तुरुंगात टाकणारा औरंगजेब होता त्याने छञपती संभाजी महाराजांवर धर्मांतरासाठी अन्याय केले ,राज्याचे आमिष दाखवले पण धर्मवीर संभाजी महाराजांनी हौतात्म्य पत्करले पण शरणागती स्वीकारली नाही. धर्मावर कठीण वेळ असून कायद्याचा वापर करून धर्मावर दडपशाही केली जाते, उरलेले जीवन छञपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण केले आहे.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास पर्यटनस्थळासारखा नव्हे तर तीर्थ क्षेत्र म्हणून व्हावा हे हिंदूचे चौदावे ज्योतिर्लिंग आहे. त्यागाचे ,बलिदानाचे व शौर्याचे प्रतीक आहे .इथे येणार सामान्य नागरिक जेंव्हा नतमस्तक होऊन बाहेर जाताना धर्मवीर होऊन जाईल असे करावे इथे बियर बार ,व्यसन केंद्र नको.पर्यटन नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यात यावा असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. औरंगाबाद नामांतराविषयी औरंगजेबाचे महत्व सांगणारे इतिहासाला नाकारणारे नाव बदलले,औरंगजेबाची पिलावळ नाव बदलू देत नव्हती ,जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छञपती संभाजी महाराजांचे नाव राहणार, २७ वर्षे इथे औरंगजेब इथे खितपत होता रडत होता अखेर त्याला महाराष्ट्रात मूठमाती देण्यात आली असे मत सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी व्यक्त केले.
३३४ व्या बलिदान स्मरण दिन कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार आढळराव पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाची महती सांगत महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की स्मारक चांगले व्हावे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २६७ कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली होती हे काम विद्यमान सरकार मुळे काम गतिमान व्हावे. सत्तांतर झाल्यावर स्मारकाचे नाव स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणून करण्यासाठी प्रयत्न केले. धर्मवीर नाव महत्वाचे आहे. स्मारकाचा ३९७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला यामध्ये ६ कोटी रुपयांचा तुळापूर व वढू बुद्रुक साठू प्रत्येकी एक भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे येणाऱ्या महिन्यात काम सुरु होईल. त्यावेळी महिन्यात मुख्यमंत्र्यांना जोडीने घेऊन येणार. असल्याची माहिती माजी खासदार आढळराव पाटील यांनी दिली.
राज्याचे अर्थसंकल्पीय सुरू असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विरोधीपक्ष नेते अजित पवार,पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अशोक पवार उपस्थित राहू शकले नाहीत.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी व महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास शालेय पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाविष्ट करावा – माजी सरपंच व चेअरमन प्रफुल्ल शिवले
यावेळी देण्यात आलेले पुरस्कार -१) रवि पडवळ व त्यांचे ५ सहकारी शंभूसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.छञपती संभाजी महाराजांचे नाव बिडिला देण्यात आले होते त्याविरोधात आंदोलन करून नाव बदलण्यास लावले या कार्याबद्दल हा सन्मान देण्यात आला.२) संजय साळुखे सोलापूर यांना शंभूसेवा पुरस्काराने गौरवण्यात आले ३) मनिंदरसिंह बिट्टा यांना स्वराज्य रक्षक धर्मवीर छञपती संभाजी महाराज पुरस्काराने गौरवण्यात आले.४)सुदर्शन चित्रवाणीचे संपादक सुरेश चव्हाणके यांना शंभूसेवा पुरस्कार ५) धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच अंकुश शिवले यांनिंकेले तर सूत्रसंचालन नवनाथ गुंडाळ,सोमनाथ भंडारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार हिरालाल तांबे यांनी मानले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र खांडरे, माजी सभापती मोनिका हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे ,माजी उपसभापती सविता पऱ्हाड,बाळासाहेबांची शिवसेनेचे अनिल काशीद , तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, सरपंच सारिका अंकुश शिवले, चेअरमन प्रफुल्ल शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळ, व्हॉईस चेअरमन काळूराम गोसावी,माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य अनिल शिवले, ज्ञानेश्वर भंडारे, कृष्णा आरगडे, अंजली शिवले, संगीता सावंत, रेखा शिवले, शिलावती भंडारे,रोहिणी भंडारे, अनिल भंडारे, संभाजी महाराज स्मृती समिती अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भंडारे, रमेश भंडलकर, ग्राम विकास अधिकारी शंकर भाकरे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, क्लार्क संतोष शिवले व मोठ्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शासनाकडून पि एम टी व्यवस्था करण्यात यावी.ज्यामुळे अनेक शंभू भक्तांना बलियादन दिनी उपस्थित राहता येईल. – सरपंच सारिका अंकुश शिवले, वढू बुद्रुक