धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पाचा इतर गावांनी आदर्श घेतला पाहिजे
कोरेगाव भीमा – दिनांक २४ जुलै
माहिती सेवा वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष धर्मराज बोत्रे व पिंपळे जगताप ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पिंपळे जगताप ( ता.शिरूर) या ठिकाणी धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प साकारत आहे. आत्तापर्यंत या वनराई १५ हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले आहे.
संभाजीनगर येथील अप्पर जिल्हाधिकारी समिक्षा गोकुळे यांच्या शुभहस्ते पिंपळे जगताप याठिकाणी ३०० झाडांचे वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली. २ आक्टोंबर पासून सुरू केलेले वृक्षारोपण आत्तापर्यंत १५ हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले. कमी कालावधीत १५ हजार देशी झाडे लावण्यात आल्याबद्दल त्यांनी सर्व वृक्ष मित्रांचे कौतुक केले.तसेच त्याठिकाणी वृक्षदाण करणारे उद्योजक सागर भाडळे, उद्योजक राहुल गव्हाणे यांचे अप्पर जिल्हाधिकारी समीक्षा गोकुळे यांनी आभार मानले.बकोरी देवराई वनराई प्रकल्प, धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प अशाप्रकारे शेकडो प्रकल्प साकारण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगत एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचा योग आला व एक वेगळे समाधान लाभल्याचे हडपसर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार शरद पाबळे, या प्रकल्पासाठी लाखो रुपयाची झाडे दान देणारे वाघोली येथील उद्योजक सागर भाडळे, या प्रकल्पासाठी पोकलेन मशीन व आवश्यक असेल ती मदत करणारे डिंग्रजवाडीचे माजी सरपंच उद्योजक राहुल गव्हाणे, वृक्ष रोपण कामात सक्रिय श्रमदान करणारे संदिप ढफळ ,अजित रणसींग, प्रविण रणसींग, मंगेश जाधव,प्रकल्पाचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर कुमार साईराज तांबे, जगताप गुरुजी, सुर्यकांत टाकळकर गुरुजी, राजेंद्र तांबे,शिवम परीवाराचे कार्यकर्ते, डिंग्रजवाडीचे माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे, वेदांत रणसींग, उद्योजक रामदास दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प,बकोरी देवराई वनराई प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांसाठी अहोरात्र मेहनत करणारे वृक्ष मित्र धर्मनाथ बोत्रे, चंद्रकांत वारघडे हे उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचे व श्रमदानासाठी आलेल्या सर्व वृक्ष मित्रांचे आभार सुर्यकांत टाकळकर गुरुजी यांनी मानले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.