क्रेडिट कार्ड,पर्सनल लोन व इतर पाच सहा ठिकाणाहून घेतले होते लोन
पुणे – हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली असून प्रेयसीने स्वताच्या नावावर लोन काढून प्रियकराला पैसे दिले मात्र त्याने फक्त आश्वासने देत हप्ते न भरल्याने दोघांमध्ये वाद झाले मानसिक त्रासातून पंचवीस वर्षीय प्रेयसीने १५ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या आत्महत्या केली असून याबाबत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या वडिलांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादी यांची मयत मुलगी व तीचा आरोपी मित्र- आदर्श अजयकुमार मेनन यांचे जानेवारी २०२३ पासून प्रेमसंबंध होते. त्यास फिर्यादी यांची मयत मुलीने आरोपी आदर्श अजयकुमार मेनन रा.मांजरी मूळ रा.पडेगाव प्रियदर्शनी कॉलनी ,संभाजीनगर याच्या सांगणेवरून वेळोवेळी क्रेडीट कार्ड, पर्सनल लोन व इतर ५/६ लोन ॲप वरूनलोन (कर्ज) घेवून ते पैसे खर्च करण्यास दिले. सदरचे कर्जाचे हप्ते आरोपी हा फेडणार असे मयत मुलीस आश्वासन देवूनही त्याने ते वेळोवेळी फेडले नाही. या कारणांवरून दोघांमध्ये वारंवार भांडण देखील होत होते. त्यामुळे फिर्यादी यांची मुलीला कर्जाचे हप्ते वेळोवेळी न फेडता मानसिक त्रास देवून आरोपीने तीला त्याच्या राहते घरातील (बी- ५०२, शारदा आनन्या सेंटर ४० फुट रोड, दत्त मंदीराचे समोर, भेड कॉर्नर, मांजरी पुणे) येथे बेडरूममध्ये गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गांधले करत आहेत.