४,८,९,१३ वर्षांच्या लेकरांसह ३६ वर्षीय महिला मृत्यू
पुणे -पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील वॉटर फॉलमध्ये पर्यटक हे थेट भुशी धरणात वाहून गेले. यात लहान मुले, ३६ वर्षिय महिलेचा समावेश आहे.
लोणावळ्यात वर्षाविहासाठी गेलेले पाच जण वाहून गेले आहेत. अन्सारी हे कुटुंब भुशी धरणाच्या वर असलेल्या जंगलात वॉटर फॉल (बॅक वॉटर) येथे वर्षाविहाराचा आनंद घेत होते. तेव्हा, पाच जण या वॉटर फॉलमधून भुशी धरणात वाहून गेल्याचे लोणावळा पोलिसांनी माहिती दिली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. भुशी धरण देखील ओव्हरफ्लो झालं असून पर्यटकांची गर्दी होत आहे.
एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले – भुशी धरणाच्या मागील धबधबा, रेल्वे वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो. या धबधब्याचं पाणी पाणी भुशी धरणात येते. या धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अख्खं कुटुंब वाहुन गेलं आहे.
वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर – पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुशी धरण परिसरात आलेले पर्यटक धरणाच्या पात्रात बुडाले. बुडालेल्या व्यक्तींची नावे साहिस्ता लियाकत अन्सारी (वय ३६ वर्ष), अमिमा आदिल अन्सारी (वय १३ वर्ष), उमेश आदिल अन्सारी (वय ८ वर्ष), अदनान सबाहत अन्सारी (वय ४ वर्ष) आणि मारिया अकील सय्यद (वय ९ वर्ष) अशी आहेत. यापैकी साहिस्ता, अमिमा आणि उमेश यांचा मृत्यू झाला असून त्याचे मृतदेह सापडले आहेत. तर, बुडालेल्या इतर दोघांचा शोध सुरु आहे.