हडपसर पोलीस चौकीत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल ,वॉचमनचे आणि आरोपींचे वैयक्तिक वादामुळे हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे
हडपसर -पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.Shocking… Attempt to burn MLA Rohit Pawar’s office in Pune. याप्रकरणी अज्ञात आरोपीं विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(pune Crime News) आमदार रोहित पवार यांच हडपसर परिसरात सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. Shocking… Attempt to burn MLA Rohit Pawar’s office in Pune
कर्जत – जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं हडपसर परिसरातील सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांचे कार्यालय असलेल्या बिल्डिंगमध्ये शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी हडपसर(Hadpasar) पोलीस ठाण्यात तकार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हडपसर येथील आमदार रोहित पवारां(Rohit Pawar) च्या कार्यालयात शनिवारी (दि.१५) रात्री तीन व्यक्ती येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. अज्ञातांकडून पवार यांच्या पार्किंगमध्ये असलेली सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील करण्यात आली आहे. रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आल्याची माहिती आहे.शेजारीच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न का केला असे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे आमदार रोहित पवार यांचे कार्यालय ज्या बिल्डिंगमध्ये आहे, त्या ठिकाणी असलेल्या वॉचमनची सायकल जाळण्याचा प्रकार घडला. वॉचमनचे आणि आरोपींचे वैयक्तिक वादामुळे हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेत रोहित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आतील बाजूस आणि बाहेरील बाजूस काहीही झालेलं नाही असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.