श्री स्वामी समर्थ सणसवाडी सेवाकेंद्र नूतन वास्तू लोकार्पण व द्वितीय वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) समाजात उच्चशिक्षित पिढी वाढत आहे तशीच वृध्दाश्रमात व त्यामध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. A फॉर आई B फॉर बाबा हे शिकवण्याची गरज आहे. भारत वृध्दाश्रम मुक्त करायचे असेल संस्कारक्षम पिढी घडवायला हवी. उच्च शिक्षण वाढले पण माणुसकीचं काय? शेतकऱ्यांचे आईवडील कधीच वृद्धाश्रमात आढळतत नाही. या देशातील नारीशक्ती ही सर्वात महान शक्ती असून सर्वात वंदनीय आहे देशाला बलवान बनवायचे असेल संस्कारशिल पिढी घडवायला हवी असे श्री स्वामी समर्थ सणसवाडी सेवाकेंद्र नूतन वास्तू लोकार्पण व द्वितीय वर्धापन सोहळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर गुरुपिठाचे प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांनी शिवम मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात भविकांशी हितगूज साधले.
यापुढे हितगुज साधताना चंद्रकांत दादा मोरे यांनी विद्येची देवता शारदा, रक्षण करणारी दुर्गा, अन्नपूर्णा, लक्ष्मी माता महिला असून या स्त्री देवता जीवनाला समृद्धी देतात. गार्गी, मैत्रेया अशा अनेक वेदकालीन विदुषी महिलांचे उदाहरण देत नारीशक्ती बाबत आदर व्यक्त केला.घरी राजमाता जन्माला यायला हवी तेंव्हा शिवराय जन्माला येतील.काया,वाचा, मनाने आपण शुद्ध राहायला हवे.नारी ते नारायणी ही संकल्पना भारतीय संस्कृतीत आहे. भक्ती ही जीवनाला आकार देत संकटातून तारणारी,मनाला शांतता देणारी असून भारतीय अध्यात्माला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवे असे सांगत सामुद्रिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, हस्तशास्त्र, भक्ती अशा विविध विषयांवर सखोल अध्यात्मिक मार्गदर्शन करत धर्म, नाती, संस्कृती, वास्तू,कृषी व अध्यात्म यांसह वी उद्ध विषयावर हितगुज साधत अनमोल मार्गदर्शन केले.
दिंडोरी हे महिलांचे माहेर – महिला हक्काने दिंडोरी येथे येतात आपल्या मनातील सर्व व्यथा आनंद मांडतात त्यांना येथे आल्यावर प्रेरणा मिळते. स्वामी त्यांच्या मागे उभे राहतात अशी भावना चंद्रकांत दादा मोरे यांनी व्यक्त केली.
भव्यदिव्य मिरवणूक सोहळा – श्री स्वामी समर्थ सणसवाडी सेवाकेंद्र नूतन वास्तू लोकार्पण व द्वितीय वर्धापन सोहळ्यानिमित्त सकाळी आरोग्य शिबिर व नाडी परीक्षण कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ भव्य पालखी मिरवणूक सोहळा पार पडला यावेळी हजारो माता भगिनी ,अबालवृद्ध ,भक्त व साधक उपस्थित होते. लहान बालके,पुरुष साधक व महिलांनी भगिनींनी पारंपरिक वेश परिधान केले होते. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
भव्य दिव्य स्टेज – सणसवाडी येथील शिवम लॉन्स मध्ये उभारण्यात आलेल्या स्टेज भाविकांचे मन आकर्षित करत होते. स्तेजला भव्य मंदिराच्या स्वरूपात सजवण्यात आले होते. वरच्या बाजूलाआदी शंकराचार्यांचा फोटो, मध्यभागी स्वामी समर्थांचा फोटो व श्री दत्तात्रय महाराजांचा फोटो तर दादा मोरे यांना बसण्यासाठी मोर पिसाऱ्यांचे आकर्षक शुभ्र आसन,आकर्षक भव्यदिव्य स्टेज, एल ई डी स्क्रीन, दर्जेदार साऊंड व्यवस्था यामुळे आकर्षक असा सोहळा पार पडला.
श्री जनकल्याण योजनेतून हजारों खाटांचे उभारणार हॉस्पिटल – ३ लाख १५ हजार स्क्वेअर फूट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ व अनुभवी डॉकटर, सर्व प्रकारचे आजार व त्यावरील उपचार हजारो खाटांचे हॉस्पिटल उभे राहत असून मे पर्यंत पहिला स्लॅब उभारणार आहे.गोरगरिबांना मोफत उपचारांसाठी दीडशे खाटा उपलब्ध राहणार असून या हॉस्पिटल मध्ये पाच हजार रोजगार उपलब्ध होणार आहे.. या सामाजिक कार्यासाठी सर्वांनी सढळ हाताने दान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन समस्त श्री स्वामी समर्थ साधक, ग्रामस्थ व विविध सामाजिक घटकांच्या व दानशूर भक्तांच्या अनमोल सहकार्याने पार पडला.
या सोहळ्यासाठी श्री समर्थ ज्वेलर्स बरमातिकरचे अशोक सोनार,माजी सरपंच सुरेश हरगुडे, माजी चेअरमन नामदेव दरेकर, अरुण हिरे, सुनील भोसुरे, कोमल ढेकळे, मनिषा हिरे, गौरी यादव, उज्वला पानसरे, दीपक पानसरे, प्रदीप शास्त्री व इतर स्वामी भक्त व नागरिकांनी श्रम घेत सोहळा यशस्वी पार पाडला.