Thursday, November 21, 2024
Homeक्राइमदुर्दैवी घटना … दुचाकीवरील आठ वर्षाच्या मुलासह वडिलांचा जागीच मृत्यू तर आई...

दुर्दैवी घटना … दुचाकीवरील आठ वर्षाच्या मुलासह वडिलांचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी

ट्रकचे चाक भाऊसाहेब व अश्विन यांच्या अंगावरून गेल्याने बापलेक जागीच ठार

कोरेगाव भीमा – पाबळ- शिरूर रस्त्यावर खैरेनगर जवळ ट्रक चालकाची धडक बसल्याने दुचाकीवरील दाम्पत्याला बसून भाऊसाहेब काळूराम चौधरी व अश्विन भाऊसाहेब चौधरी या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता भाऊसाहेब चौधरी गंभीर जखमी झाल्या असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अमोल सुदाम कदम या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Bhausaheb Kaluram Chaudhary and Ashwin Bhausaheb Chaudhary died on the spot while a couple riding a two-wheeler was hit by a truck driver on the Koregaon Bhima-Pabal-Shirur road near Khairenagar and Anita Bhausaheb Chaudhary was seriously injured.


                             शिरूर खैरेनगर पाबळ रस्त्याने भाऊसाहेब चौधरी रात्रीच्या सुमारास एम एच १२ सि क्यू ८५३७ या दुचाकीहून पत्नी व मुलासह जात असताना हॉटेल बैठक समोर पाठीमागून आलेल्या एम एच १२ यु एम २३०३ या ट्रकची चौधरी यांना जोरदार धडक बासल्याने भाऊसाहेब व मुलगा अश्विन रस्त्यावर पडले आणि त्यांची पत्नी अनिता रस्त्याचे बाजूला पडली यावेळी ट्रकचे चाक भाऊसाहेब व अश्विन यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
  दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून देऊन जखमी महिलेला उपचारासाठी हलवले, यावेळी पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता तो दारु पिल्याचे निदर्शनास आले, सदर अपघातात भाऊसाहेब काळूराम चौधरी वय ४३ वर्षे व अश्विन भाऊसाहेब चौधरी वय ८ वर्षे दोघे रा. खैरेनगर (ता. शिरुर जि. पुणे) या दोघांचा  जागीच मृत्यू होऊन अनिता भाऊसाहेब चौधरी वय ३५ वर्षे रा. खैरेनगर  या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सदर घटनेबाबत गणेश शंकर चौधरी वय ५३ वर्षे रा. रा. खैरेनगर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमोल सुदाम कदम वय ३० वर्षे रा. चांडोली (ता. खेड जि. पुणे) या ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!