Sunday, September 8, 2024
Homeताज्या बातम्यादरेकरवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार, हजारो रुपयांची उलाढाल

दरेकरवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार, हजारो रुपयांची उलाढाल

कोरेगाव भिमा – दरेकरवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेकरवाडी येथे शनिवारी बाल आनंद मेळावा आयोजित केला होता.यावेळी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते यातून विद्यार्थ्यांच्या बाजारात सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हजारो रुपयांची उलाढाल झाली.

या उपक्रमात सर्व पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बाजार, दैनंदिन व्यवहार यांची माहिती होण्यासाठी बाजाराचे आयोजन केले होते. बाजारात खाद्यपदार्थ, भाजीपाला या प्रकारचे अनेक स्टाॅल लावण्यात आले असल्याने विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांनी त्यास भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांमुळे मुलांना व्यावाहारिक ज्ञान व प्रात्यक्षिक व्यवहार यांचा अनुभव तर मिळण्यास २५ ते ३० हजार रुपयांची उलाढाल झाली.

यावेळी सरपंच सरपंच आशा दरेकर, उपसरपंच कमल दरेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर दरेकर, उपाध्यक्ष अश्विनी कड,सदस्य शंकर दरेकर, ज्ञानेश्वर गव्हाळे, नंदकुमार भोसले, राहुल आवटे, वृषाली दरेकर, कविता दरेकर, स्नेहल दरेकर, सुरेखा दरेकर, संदीप दरेकर ल, माजी अध्यक्ष प्रमोद शेलार, माजी उपाध्यक्ष रोहिणी दरेकर , माजी सरपंच ज्ञानेश्वर चकोर, माजी सरपंच प्रमिला दरेकर, माजी सदस्य सुनिता दरेकर, अंगणवाडी सेविका मंदाकिनी दरेकर, नितीशा दरेकर, कुंभार सर, दरेकर, मोरे, कुंभार, साळुंके, दरेकर मॅडम व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक काळूराम पिंगळे सरांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!