वेळनदीला अतिवृष्टीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे तळेगाव ढमढेरेहून बायपास मार्गे शिक्रापूरला कासारी फाटा अहमदनगर-पुणेकडे जाणाऱ्या पुलाचा भराव गेला वाहून
तळेगाव ढमढेरे – दिनांक १२ सप्टेंबर
पाबळ, केंदूर ,सातगाव पठार, वाफगाव या गावांना जोरदार पाऊस झाला आहे .त्यामुळे रात्री दहा वाजता वेळ नदीला पाण्याचा विसर्ग अचानक झपाट्याने वाढला .तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील वेळनदीवर असणारा तळेगाव ढमढेरे -न्हावरा या मार्गावरून धायरकरवस्ती या मार्गे शिक्रापूर -कासारी फाटा अहमदनगर नगर-पुणेकडे जाणाऱ्या या रिंगरोडला मिळणाऱ्या पीएमआरडी रोडचा वेळनदीवरील या पुलाचा भराव रात्री १० च्या सुमारास अचानक नदीला पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुलाच्यावरून पाणी वाहू लागले.त्यामुळे पुलाच्या बाजूचा भराव पाण्याच्या दबावाने वाहून गेला.
शिक्रापूर येथील वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी या भागातील नागरिक या पुलाचा वापर करतात. पीएमआरडीच्या माध्यमातून नुकताच हा रस्ता शिक्रापूरपर्यंत पूर्ण डांबरीकरण व रुंदीकरण झाले असल्याने सोयीस्कर व सोपा मार्ग म्हणून या भागातील नागरिक या मार्गाचा वापर करत परंतु भराव वाहून गेल्याने यावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सदर पुलाची पाहणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली असून पीमआरडी विभाग ,सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर यांना पुलाच्या भरावाच्या दुरुस्ती बाबत तातडीने पत्रव्यवहार केला आहे.तसेच शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना पत्राद्वारे माहिती कळविली असून पुढील कार्यवाही होईपर्यंत तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करून वाहतूक सुरु केली जाईल.