तळेगाव ढमढेरे दिनांक १२ ऑगस्ट
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे ,पोलीस चौकी तळेगाव ढमढेरे ,शालेय विद्यार्थांनी व नागरिकांनी प्रभात फेरी काढत देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त हर घर झेंडा हा नारा देत यावर्षी सर्वांनी आपल्या घरावर देशाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकावत स्वतंत्राचा अमृतमहोत्सव साजरा करू असे आव्हान करण्यात आले.
तळेगाव ढमढेरे येथील एस टी स्टॅन्ड ते बाजार मैदान मार्गे प्रभात फेरी काढली यामध्ये तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय शाळा नंबर १ व २ ,समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्य व उच्च माध्य विद्यालय,स्वतंत्र सैनिक आर.बी.गुजर प्रशाला या शाळेतील विद्यार्थांनी प्रभात फेरी मध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सुदीप गुंदेचा,तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ , शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,पोलीस पाटील पांडुरंग नरके ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी हातामध्ये भारताचा तिरंगा घेऊन गावामध्ये हर घर झेंडा हा केंद्र व महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी सर्व नागरिकांना आव्हान केले.
यावेळी टाकळी भीमा गावचे पोलीस पाटील प्रकाश करपे,पोलीस हवालदार किशोर तेलंग,संदीप कारंडे,गणेश करपे,पोलीस नाईक सागर कोंढळकर,संतोष मारकड,आत्माराम तळोले,पोलीस कॉन्सटेबल भास्कर बुधवंत ,मुख्याध्यापक जयवंत भुजबळ,बाळासाहेब चव्हाण,सुवर्णा चव्हाण,सुनिता पिंगळे तसेच इतर गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत कार्यालयात ध्वज उपलब्ध आहेत.नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयातून ध्वज घेऊन जावे. – सरपंच अंकिता भुजबळ ,ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे