महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र पुणे विद्यमाने फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू…
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे विद्यमाने महिलांना फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कोर्स सुरु करण्यात आला असून या प्रशिक्षणाचे उद्घाटन मदनकुमार शेळके यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी सरपंच सेवा संघाच्या उद्योजिका वंदना पोटे यांच्या उपस्थितीत होत्या. महाराष्ट्रात ग्रामीण भागात विविध प्रकारच्या कोसेर्स घेऊन ग्रामविकास तसेच ग्रामीण भागात छोटे छोटे उद्योग सुरू करून उद्योजक निर्माण करण्यासाठी हा प्रशिक्षण राज्यभर राबविले जात आहे. यामुळे विठ्ठलवाडी येथील महिलांना उद्योग शेत्रात काम करण्याची संधी झाली आहे.
उद्घाटन प्रसंगी पुणे विभागाचे रीजनल ऑफीसर सुदाम थोटे , पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके यांचे मार्गदर्शन केले . शिरूर तालुका प्रोग्राम समन्वयक सविता गवारे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव ढमढेरे येथे बाजार मैदान बुध्दविहारात ह्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रशिक्षण महीनाभर चालणार आहे यातून महीलाना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे असल्याचे शेळके यांनी सांगितले .