Saturday, September 7, 2024
Homeताज्या बातम्याडिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी. फार्मसीच्या उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला .डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहिली असून या विद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल १००%  व द्वितीय वर्षाचा निकाल ९८ % लागला असून या परीक्षेत प्रथम वर्ष डी. फार्मसी मध्ये साठे शुभांगी ८४.९०%, कांचन श्रद्धा ८२.७० %, पंडित प्रतिभा ८१.९०% तसेच द्वितीय वर्षात इनामदार सादिया ८८.०९%, खान अहमद ८५.३६%, शिंगणे शेजवळ ८४.७३% यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नासीर  शेख, सहसचिव ॲड. जाहिद शेख, सीईओ  अमीर इनामदार, प्राचार्य डॉ. संपत नवले, प्रा. सोनल सातव, प्रा.जीवन राजगुरू, प्रा. अनुपमा इसाल, प्रा.कोमल हुंबे, प्रा. रेखा गायकवाड तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!