Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याडिंग्रजवाडी येथे तिरंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तीनशे महिलांच्या उपस्थितीत रंगला होम मिनिस्टर...

डिंग्रजवाडी येथे तिरंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तीनशे महिलांच्या उपस्थितीत रंगला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम 

भर पावसात रंगला खेळ पैठणीचा, विजेत्या महिलांना पैठणी, सोन्याची नथ व चांदीच्या छल्याचे जिंकले बक्षीस

कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील  तिरंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात या वर्षी मंडळाच्या माध्यमातून उत्सव गजाननाचा, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पडला.

     आदर्श ग्राम असणारे डिंग्रजवाडी येथे तिरंगा स्पोर्ट्स क्लब गणेशोस्तव मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यावर्षी मंडळाच्या वतीने महिला भगिनिंसाठी उत्सव गजाननाचा, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा खेळ घेण्यात आला होता.यावेळी डिंग्रजवाडी गावातील तीनशे  महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विजेत्या महिलांना पैठणी, सोन्याची नथ व चांदीच्या छल्याचे  बक्षीस जिंकले.यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना तीनाशेच्यावर महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी मंडळाच्या वतीने महिला भगिनींना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था करण्यात आली होती.

   यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात उखाणे घेतले, जुन्या पिढीतील महिलांचे बराच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व संस्कृतीचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती. यावेळी विशेष म्हंजे तळ्यात मळ्यात हा खेळ तर खूपच रांगल्याने  महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला.

  यावेळी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा  हा कार्यक्रम निलेश पापट यांनी घेतला यावेळी विविध गाणी,खेळ व स्पर्धा घेत कार्यक्रम खूपच उत्साहाच्या व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

  यावेळी उत्सव गजाननाचा, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवत पैठणी साडी जिंकण्याचा मान दिपाली सुधीर गव्हाणे यांना, द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ मिळवण्याचा शिल्पा संदीप ढवळे मान यांनी तर  तृतीय क्रमांकाचा चांदीचा छल्ला जिंकण्याचा मान अश्विनी विशाल गव्हाणे यांनी मिळवला.

    यावेळी तिरंगा स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष व माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे, उपाध्यक्ष विशाल गव्हाणे, अवधूत गव्हाणे, ऋषिकेश चव्हाण, राहुल गायकवाड, अभिजीत गव्हाणे, तेजस गव्हाणे, समीर गव्हाणे, अमोल गव्हाणे, शशिकांत गव्हाणे, अतुल गव्हाणे, अथर्व गव्हाणे यांच्यासह इतर आजी माजी पदाधिकारी व  तीनशे पेक्षा अधिक माताभगिनी उपस्थित होत्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!