त्वरित खोदकाम थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, जयस्तंभा समोरून गॅस पाईप लाईन नेण्याविरोधात पहिला आवाज उठवला प्रा. जोगेंद्र कवाडे गटाने
कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.हवेली) येथील पीपल्स रिपब्लिक पार्टी दलीत मुक्ती सेनेच्या रमाई ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्ष लता शिरसाट यांनी ऐतिहासिक जयस्तंभ येथून जाणारी टोरंट गॅस कंपनीची भूमिगत गॅस पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून सदर पाईप लाईन स्थलांतरित करण्याबाबतचा अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहलता कदम यांच्याकडे सुपूर्त करत संबधित गॅस पाईप लाईनला विरोध दर्शवण्यात आला आहे.त्वरित खोदकाम थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, जयस्तंभा समोरून गॅस पाईप लाईन नेण्याविरोधात पहिला आवाज उठवला प्रा. जोगेंद्र कवाडे गटाने उठवला असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष लता शिरसाठ यांनी देत याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात ,”मे टोरंट गॅस पुणे लि. या प्रस्तावित गॅस पाईपलाईन हि ऐतिहासिक विजय स्तंभ (पेरणे फाटा) जवळून जात असून विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला लाखो भीमसैनिक लोक येत असतात. तसेच या ठिकाणी वर्षभर शालेय सहली, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून सुट्टीच्या दिवसात भीमसैनिक विजय स्तंभास अभिवादन करण्यात येत असतात. नॅशनल गॅस गळती झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरची गॅस पाईपलाईन हि इतर ठिकानावरून टाकणे मानवी जीविताच्या हिताचे आहे.
तसेच १ जानेवारी २०१८ रोजी समाजकंटकांनी कोरेगाव भीमा येथे दंगल घडवून आणली होती. सदरची पाईपलाईन ऐतिहासिक विजयस्तंभ (पेरणे फाटा) येथून गेली तर माथेफिरू समाजकंटका कडून अनुचित प्रकार घडू शकतो त्यातून “मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते, याची नोंद घ्यावी.
मे. टोरंट गॅस पुणे लि मार्फत गॅस पाईपलाईन टाकण्यात येत असलेल्या फेरबदल व्हावा तरी सदर गॅस पाईपलाईन पेरणे फाटा कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभ व भीमा नदीवरील पुलाच्या शेजारहून जात हे आहे. त्यामुळे ऐतिहासिक पुलाला कोणताही धोका नसल्याबाबत बांधकाम विभागाच्या वतीने संबंधीत स्ट्रक्चर ऑडीट करण्याचा अधिकाऱ्याने स्वतः च्या जबाबदारीने हमीपत्र लिहून देण्यात यावे व भविष्यात जर भीमानदी वरील पुलास काही बाधा किंवा धोका निर्माण झाल्यास यास ते जबाबदार राहतील.
तसेच दुर्दैवाने या कंपनीच्या गॅस पाईपलाईनमुळे भीमा नदीवरील पुलास धोका निर्माण झाल्यास किंवा जीवित हानी झाल्यास केंद्र, राज्य, जिल्हा प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांचेकडून मिळणारी नुकसान भरपाई व तिचे स्वरूप कश्या प्रकारे आहे? याचा सविस्तर खुलासा करावा व सदर बाबतीत केंद्र, राज्य, जिल्हा प्रशासन यांचेकडे कंपनीकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठेवण्यात आलेली अनामत रक्कम याचा खुलासा कंपनीने करावा.
या कंपनीकडून खोदकाम सुरु आहे. ते काम संबंधीत अधिकाऱ्यांनी त्वरित थांबवावे. बांधकाम विभागाचे अधिकारी व कंपनीकडून हमीपत्र मिळाल्यानंतरच काम सुरु करण्यात यावे. अन्यथा पिपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
तसेच १ जानेवारी २०१८ रोजी समाजकंटकांनी कोरेगाव भीमा येथे दंगल घडवून आणली होती. सदरची पाईपलाईन ऐतिहासिक विजयस्तंभ (पेरणे फाटा) येथून गेली तर माथेफिरू समाजकंटका कडून अनुचित प्रकार घडू शकतो त्यातून “मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते, याची नोंद घ्यावी.
१ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनेने जयस्तंभ परिसर हा अत्यंत संवेदनशील व राज्यशासना समोरील अत्यंत गंभीर विषय असून आता यावरून दलीत संघटना मोठ्या प्रमाणावर आक्रमक होताना दिसत आहे.यामध्ये पुणे जिल्ह्यातील पहिला आवाज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या दलीत मुक्ती सेनेच्या रमाई ब्रिगेच्या पुणे जिल्हाध्यक्ष लता शिरसाट यांनी उठवला असून आता महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील अनेक दलीत संघटना यात उतरून विरोध करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत संबधित कंपनीने सर्व परवानग्या घेतल्या असल्याची माहिती दिली असली तरी याबाबत दलीत संघटना नेमकी काय भूमिका घेतात हे आगामी काळच ठरवेल.
याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या दलीत मुक्ती सेनेच्या रमाई ब्रिगेच्या पुणे जिल्हाध्यक्ष लता शिरसाट यांनी शासनाला निवेदन दिले असून यामध्ये पुणे जिल्ह्याच्या निवसी उपजिल्हाधिकारी स्नेहलता कदम , डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रश संस्था (बार्टी) महासंचालक कार्यालय, पुणे जिल्हा बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल कदम, गट विकास अधिकारी हवेली, लोणीकंद पोलीस स्टेशन, पेरणे ग्राम पंचायत, कोरेगाव भीमा ग्राम पंचायत,शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे.
याबाबत वरिष्ठांशी सविस्तर चर्चा करण्यात येऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. – राहुल कदम, उप अभियंता बांधकाम विभाग पुणे