Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याटीडीआर घोटाळा: संभाजी ब्रिगेडचे मंगळवारपासून बेमुदत साखळी उपोषण 

टीडीआर घोटाळा: संभाजी ब्रिगेडचे मंगळवारपासून बेमुदत साखळी उपोषण 

पिंपरी: बहुचर्चित वाकड टीडीआर घोटाळ्याला प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर घोटाळ्यातील सराईत मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने येत्या मंगळवारपासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी महापालिकेसमोर “बेमुदत साखळी उपोषण” करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिली आहे.

           याबाबत सतिश काळे यांनी मनपा आयुक्त तसेच पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाकडमधील टीडीआर घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या घोटाळ्यामुळे पिंपरी महापालिकेचे तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान होत महापालिकेची राज्यात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. सदरील घोटाळ्याविषयी विधासभेच्या अधिवेशनातही चर्चा झाली होती. कालांतराने कथित भ्रष्टाचाराचे गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर मनपा आयुक्तांनी वादग्रस्त वाकड टीडीआर प्रकरणाला स्थगिती दिली. याचाच अर्थ झालेल्या गैरकारभाराला त्यांनी दुजोरा दिला आहे. परंतु यात दोषी असणारे टीडीआर घोटाळ्याचे सराईत मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्यावर कारवाई न करता, त्यांना आहे त्याच पदावर कायम ठेवणे म्हणजे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला पाठबळ दिल्यासारखेच आहे.

     दरम्यान,आम्ही गेल्या महिनाभरापासून पुराव्यानिशी तक्रारी करीत आहोत. तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिकेसमोर “धरणे आंदोलन” करण्यात आले होते. वाकड टीडीआर प्रकरणाला स्थगिती देऊन महापालिका प्रशासनने झालेल्या प्रकरणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु या संपूर्ण घोटाळ्यातील सराईत मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व विविध विभागातील इतर दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई कधी करण्यात येईल? हा मूळ प्रश्न माञ आजही अनुत्तरीत आहे. शहरातील करदात्यांच्या पैशांची लूट करणार्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गैरकारभारात महापालिका प्रशासन ही सामील आहे का? असा सवाल सुजाण नागरिक विचारत आहेत.

त्यामुळे निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आऊट गेटवर संविधानिक मार्गाने अनेक उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून “बेमुदत साखळी उपोषण” करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!