माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसून झाडल्या होत्या गोळ्या
पुणे – माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळा मोरे यांच्यावर त्यांच्या कार्यालयात जाऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणातील दोघांना गुन्हे शाखेने लोणीकंद (पुणे) येथून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर (दि.७ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी त्यांच्या कार्यालयात शिरले. तिथे बाळू मोरे हे एकटेच होते. त्यांनी बाळू मोरे यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर या हत्येचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी पुण्यातील लोणीकंद परिसरात दोन आरोपींना अटक केली आहे.
आरोपींच्या शोधात पोलिसांच्या पाच तुकड्या रवाना झाल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील हे आरोपीच्या शोधासाठी अहमदनगर व पुणे येथे गोपनीय माहितीच्या आधारे गेले होते. संशयित आरोपी सचिन सोमनाथ गायकवाड (वय २३, रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगा, जि.जळगाव) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख (वय २३, रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव) हे पुणे परिसरातील लोणीकंद येथे असल्याच्या माहितीवरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी दिली