Saturday, September 7, 2024
Homeइतरचेअरमन बापूसाहेब भोसुरे यांची शिरूरतालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरीष्ट उपाधक्ष...

चेअरमन बापूसाहेब भोसुरे यांची शिरूरतालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरीष्ट उपाधक्ष पदी निवड

धानोरे ( ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड होऊन एक आठवड्याच्या अताच त्यांच्या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरूर तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर तालुकाधक्ष विश्वास ढमढेरे ,यांच्या उपस्थित बापूसाहेब भोसुरे यांना “शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरीष्ट उपाधक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर , पुणे जि.रा.कॉ.शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष माऊली थेऊरकर,माजी सरपंच अशोक भोरडे,सागर गव्हाणे,सोहम भोरडे उपस्थित होते.

पक्ष संघटना वाढीसह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विचार व काम पोचवण्यासह आगामी निवडणुकीत जोमाने काम करत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारआहे.- चेअरमन बापूसाहेब भोसुरे, वरिष्ठ उपाध्यक्ष,शिरूरतालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!