पुणे ग्रामीण पोलीसांची तातडीची कार्यवाही
पुणे – एका अल्पवयीन चिमुरडीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला अवघ्या चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकण्यात डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा पोलिसांना यश मिळाले आहे .पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलाची कार्यक्षमता,गतीमनाता आणि गुन्हा शोधण्याची तत्परता कौतुकास्पद आहे.
दिनांक ०२ ऑगस्ट रोजी दुपारच्यावेळी कोथर्णे ता . मावळ या गावातून एका अल्पवयीन मुलीचे कोणीतरी राहत्या घरासमोरून अपहरण केल्याबाबत तिच्या वडीलांनी पोलीस स्टेशनला येवुन माहिती दिली होती . सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता . पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ गुन्हा घडल्या ठिकाणी जावुन त्यांनी संपुर्ण गावात अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू केला .
सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देवुन अपहरण झालेल्या मुलीचा संपुर्ण गावात शोध घेवुन तपासाला गती देण्याबाबतच्या सुचना स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना दिल्या . तसेच सदर मुलीचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , वडगाव मावळ पोलीस स्टेशन व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांची वेगवेगळी तपास पथके निर्माण करण्याच्याही सुचना दिल्या होत्या.
पोलीस यंत्रणेचा तपास पथकामार्फत अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू असतांना कोंथुर्णे गावातील जिल्हा परीषद शाळेच्या पाठीमागील बाजुस अपहरण झालेली मुलगी ही संशयीतरित्या मृत अवस्थेत मिळुन आली . त्यामुळे गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीसांनी सदर गुन्हयाचा कसोशिने तपास करून गुन्हा घडले पासुन “ चोविस तासाच्या आतमध्ये ” आरोपी तेजस उर्फ दादा महीपती दळवी , (वय २४ वर्षे , रा . कोथुर्णे , ता.मावळ , जि.पुणे ) यास अटक करण्यात कामशेत पोलीसांना यश आले आहे .
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते , उपविभागीय पोलीस अधिकारी,हवेली अति कार्यभार लोणावळा विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा शाखेचे अशोक शेळके , पोलीस निरीक्षक संजय जगताप , सपोनि आकाश पवार , पोलीस उपनिरिक्षक शुभम चव्हाण , वाघमारे , शब्बर पठाण , हनुमंत पासलकर , प्रमोद नवले , नाईकनवरे , प्राण येवले , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व समिर शेख , तावरे , दिक्षित बनसोडे , राय , हिप्परकर , कळसाईत , आशिश झगडे , रविंद्र राऊळ व प्रशांत कटके , किसन बोंबले यांचे पथकाने केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगतापा , कामशेत पोलीस स्टेशन हे करीत आहेत