Sunday, September 8, 2024
Homeताज्या बातम्याग्राहकाला सबबी मान्य नाही तर सुविधा हवी - रमेश टाकळकर 

ग्राहकाला सबबी मान्य नाही तर सुविधा हवी – रमेश टाकळकर 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्याच्या वतीने कोरेगाव भिमा येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यावर कोणत्याही वस्तू बदलून देणे बंधनकारक आहे.असे मत अखिल भारतीय मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक ग्राहक पंचायतीचे रमेश टाकळकर यांनी व्यक्त केले.

कोरेगाव भीमा येथील श्री छत्रपती संभाजी हायकुल व ज्युनिअर कॉलेज येथे अखिल भारतीय मास व अखिल भारतीय सुवर्ण वर्ष पूर्ती कार्यक्रमानिमित्त बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र कदम होते.

सेल्स अँड गुड्स ॲक्ट १६/२ नुसार कोणतीही इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची वस्तू खरेदी केल्यानंतर निकृष्ट निघाल्यास उत्पादकाकडे पाठवावी लागेल बदलून मिळणार नाही. हा टोल फ्री क्रमांक घ्या तिथे कॉल करा या सबबी ग्राहकाला मान्य नसून त्याला ती वस्तू बदलून देणे बंधनकारक आहे. फसव्या जाहिराती गॅरंटी वॉरंटी ,पेट्रोल मधील भेसळ ओळखण्याची कला, अन्न भेसळ आठवडे बाजारातील फसवणूक,कापड ,औषध दुकान आदी ठिकाणी होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सुवर्ण वर्ष महोत्सवी असल्याने वर्षभर ग्राहकांच्या जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक उपक्रम करणार असून आपले प्रश्न सोडण्याची हिम्मत व सुजाणता ग्राहकांमध्ये निर्माण व्हावी याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे रमेश टाकळकर यांनी सांगितलें.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतिचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अशोक मोरे  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर तालुकाध्यक्ष संपत फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येऊन  पर्वतराज नाबगे, कोषाध्यक्ष विशाल गव्हाणे व शिरूर हवेली दिंडीचे विवेक ढेरंगे यांच्या नियोजनाने कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी सणसवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे गणेश दरेकर उपस्थित होते.प्रास्ताविक गिरी पि.आर मॅडम,आभार कांबळे एस एम मॅडम यांनी मानले

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!