शिवनेरीवर खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या कडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे अनोखे दर्शन
पुणे – शिरूर लोकसभा मतदार संघ सध्या चर्चेचा विषय ठरत असून खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या कृतीने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, शिवसंस्कार तसेच वारकरी व मराठमोळ्या संस्काराचे दर्शन घडले असून यामुळे खासदार अमोल कोल्हे यांचे कौतुक तर होतच आहे तसेच विरोध हा वैचारिक असावा वैकतुक द्वेष नसावा, विरोधकांच्या वयाचा आपण मान ठेवावा हे पुन्हा एकदा अधोरेखित करत खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची समोरासमोर भेट होताच कोल्हेंनी वाकून नमस्कार केल्याने मने जिंकली.
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे व नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रवेश करून हातात घड्याळ बांधणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवजयंती निमित्त शिवनेरी येथे समोरासमोर भेट झाली.यावेळी दोघांमध्ये काहीवेळासाठी बातचितही झाली.खासदार अमोल कोल्हेंनी आढळरावांना वाकून नमस्कार केला. एकमेकांचे हात हातात घेण्यात आले तसेच माजी खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्या पाठीवर थाप मारली यावेळी एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी लहान बालकाने मला मालिका खूप आवडती बोलल्याने सर्वांनी हसत प्रतिसाद दिला.
सदरचा व्हिडिओ खासदार कोल्हे यांनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत राजकारण हा आमचा पिंड नाही…”शिवसंस्कार” हाच आमचा पिंड ! असे विचार व्यक्त केले.
हा व्हिडिओ सर्वसामान्य लोकांच्या पसंतीस उतरत असून महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती जपण्यासह मराठमोळे संस्कार दिसून आल्याने राजकारण हे वैचारिक व ज्याच्या त्याच्या राजकीय भूमिके विषयी विरोधापुरते असावे हा संदेश अप्रत्यक्षरीत्या दिला गेला.