तळेगाव ढमढेरे येथे क्रांतीज्योती महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
कोरेगाव भिमा – शिक्रापूर (ता.शिरूर) बळीराजाच्या न्यायासाठी निघालेला शेतकरी आक्रोश मोर्चा शिक्रापूर येथे दाखल झाल्यावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी, तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या संघर्ष यात्रेला उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते तर तळेगाव ढमढेरे येथे क्रांतीज्योती महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा काढण्यात आली.यावेळी खासदार कोल्हे पाबल चौक ते शिक्रापूर बस स्थानकापर्यंत ट्रॅक्टर चालवत उपस्थितांची मने जिंकली.
खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधातील संताप लव्यित करण्यासाठी व या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हा लढा आम्ही यशस्वी करू हा विश्वास वाटत असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार व सहकाऱ्यांनी अत्यंत साधेपणाने दुपारचे भोजन तळेगाव ढमढेरे येथील मंगल कार्यालयात जमिनीवर खाली बसून मिरची,भाजी भाकरीचे भोजन केले.
यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व काँग्रेस या तीनही घटक पक्षांतील कार्यकर्ते उपस्थित होतेयावेळी शिक्रापूर येथे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः गाडीचे सारथ्य केले यावेळी त्यांच्या मागे आमदार अशोक पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढरे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे तालुकाध्यक्ष पोपट शेलार, राष्ट्रवादी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी सभापती अनिल भुजबळ, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी सभापती शंकर जामभळकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, माऊली थेऊकर ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ ,मयुर करंजे,मोहिनी मांढरे , माजी सरपंच आबा करंजे,माजी सरपंच धर्मराज वाजे, कासारीचे माजी सरपंच नाना भुजबळ,वढुचे बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते बाळासाहेब जनार्दन ढमढेरे, नवनाथ शिवले, सुदीप गुंदेचा, शहाजी ढमढेरे, निलेश दरेकर, सुभाष दरेकर, संतोष शेळके व अनेक गावाचे सरपंच उपसरपंच व मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.