अन्न प्रशासन विभाग कोमात , ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात….
शिक्रापूर पोलिसांची सणसवाडी येथील १) श्री सिद्धेश्वर पान शॉप २) सिद्धेश्वर 27 पान शॉप ३) जय मल्हार पान शॉप, कोरेगाव भीमातील १) जय मल्हार पान शॉप २) एस के पान शॉप, शिक्रापूर गावामध्ये १) जय मल्हार पान शॉप २) मोरया पान शॉप ३) जयवर्धन पान शॉप एकूण आठ पान शॉप वर कार्यवाही
कोरेगाव भीमा – दिनांक २७ जुलै
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीत सणसवाडी , कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉप वर कार्यवाही करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील तरुणाईला पानांचे अक्षरशः व्यसन लागले असून एक तरुण साधारणतः दिवसाला आठ ते दहा पाने खात असून पानाला चुना लावायला , कात,पान कातरायला, पान बनवायला माणसे कामाला ठेवावी लागत असून यामध्ये अंदाजे लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.सणसवाडी , कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉप वर कार्यवाही
तरुणांच्या आरोग्य व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून यामुळे शाळकरी व विद्यालयीन,महाविद्यालयीन तरुणही पानांचे शौकीन झाल्याचे दिसत असून शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सणसवाडी येथील १) श्री सिद्धेश्वर पान शॉप २) सिद्धेश्वर 27 पान शॉप ३) जय मल्हार पान शॉप, कोरेगाव भीमातील १) जय मल्हार पान शॉप २) एस के पान शॉप, शिक्रापूर गावामध्ये १) जय मल्हार पान शॉप २) मोरया पान शॉप ३) जयवर्धन पान शॉप हे शैक्षणिक क्षेत्राच्या परिसरामध्ये तसेच त्याच्या जवळपास, प्रतिबंधित पान मसाला ज्यावर कोणत्याही प्रकारचं नाव नाही किंवा तो धोकादायक आहे अशा प्रकारचा लेबल नसलेला पान मसाला त्या गावांमधील पान टपरी धारक पानांमध्ये मिसळून तो लोकांना विक्री करत असताना आढळून आले आहेत आणि त्याची लत विशेष करून शिक्षण घेत असलेल्या मुलांना तसेच नवयुवकांना जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून सदर मुद्देमाल जप्त करून त्याचे सॅम्पल फूड अँड ड्रग्स विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.
त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला किंवा गुंगीकारक पदार्थ आढळून आल्यास त्यांच्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. पालकांना व नागरिकांना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपल्या नवयुवकांना अशा कोणत्याही व्यसनाची बाधा होऊ नये याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि असा प्रकार आढळून आल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे.
अन्न प्रशासन विभाग कोमात , ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात….
शिक्रापूर ,कोरेगाव भीमा , सणसवाडी येथील हजारो युवकांना पानाचे व्यसन लागत असून शैक्षणिक क्षेत्राच्या परिसरामध्ये तसेच त्याच्या जवळपास, प्रतिबंधित पान मसाला ज्यावर कोणत्याही प्रकारचं नाव नाही किंवा तो धोकादायक आहे अशा प्रकारचा लेबल नसलेला पान मसाला त्या गावांमधील पान टपरी धारक पानांमध्ये मिसळून तो लोकांना विक्री करत असताना अन्न प्रशासन विभाग मात्र डोळे बंद करून बसले आहे.
यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची ‘अर्थपूर्ण ‘ मुक संमती आहे काय ? ज्यामुळे या पान शॉप वर त्यांच्याकडून अन्न व भेसळ कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असून अन्न प्रशासन विभागाच्या गलथान कारभार याला कारणीभूत ठरत असून अन्न प्रशासन विभाग कोमात आणि ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात…. अशी अवस्था झाल्याचे दिसत आहे.