१९८७- ८८ सालाचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक क शिपाई मामांसह भरला अनोखा वर्ग
कोरेगाव भीमा – दिनांक २५ डिसेंबर
कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील श्री छ्त्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील१९८७ – १९८८ बॅच मधील विद्यार्थ्यांचा ३५ वर्षांनी वर्ग भरला होता. यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक,वर्गशिक्षक,शिक्षक, शिपाई मामा यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा वर्ग भरला होता.
यावेळी ३५ वर्षांनी भेटलेल्या वर्ग मित्र मैत्रिणींनी एकमेकांची आस्थेने चौकशी करत आयुष्यातील सुख – दुःखे जाणून घेत मनमोकळा संवाद साधला. यावेळी वर्गामध्ये तत्कालीन मुख्याध्यापक ,शिक्षक आडूळकर, राऊत सर व शिपाई राऊत मामा, गव्हाणे मामा उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनमोल मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत कर्मवीर भाऊराव व डॉ बापूराव साळुंखे यांच्या शैक्षणिक योगदानाचे महत्व सांगत येथे ज्यावेळी शाळा सुरू केली तेंव्हा वर्ग नव्हते मंदिरात शिकवले ,या इमारतीचा पाया आम्ही या मुलांच्या सोबत खोदला असून हा आता वटवृक्ष झाला आहे याचा अभिमान वाटतो असे माजी मुख्याध्यापक बाबासाहेब आडुरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिकवले त्यातील डॉक्टर, प्राध्यापक,शिक्षक,मुख्याध्यापक, सरपंच ,उपसरपंच व विविध क्षेत्रातील नामवंत हुद्द्यावर काम करत आहे याचा अभिमान वाटत असल्याची भावना केली शिक्षकांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव फडतरे, मुख्याध्यापक कूभांरकर, माजी मुख्याध्यापक बाबासाहेब आडुरकर ,माजी मराठी विषय शिक्षक डी.एल देसाई सर ,प्रा.बाबासाहेब गव्हाणे, मुख्याध्यापक सुरेश भंडारे, बाळासाहेब गव्हाणे,संजय काशीद, राजेंद्र गवदे,रामदास वाघमारे,अनिल सव्वाशे, हिरामण ढेरंगे, रोहिदास भंडारे, सुरेश ज्ञानोबा भंडारे, पोपट भोर, दत्तात्रय पवार, अरविंद शिंदे,बाजीराव भंडारे,बाबाजी शिवले,सोमनाथ भंडारे,विठ्ठल भंडारे, सासवडे, वसंत गव्हाणे, भारती खुळे, मनीषा सासवडे,सुनंदा ढेरंगे,विजया आरगडे, मिमा अगरवाल, विद्या वाळके, कमल आरगडे, कमल शिवले व शाळेचे शिपाई फडतरे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुत्रसंचालन व प्रास्ताविक सुरेश लक्ष्मण भंडारे यांनी तर पाहुण्यांचा परिचय व सन्मान
प्रा.बाबासाहेब गव्हाणे यांनी केला व कार्यक्रमाचे आभार डॉ सुरेश गोसावी यांनी मानले.