निळ्या आभाळी निळी निशाणी… या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी…
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला २०५व्या शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी रविवारी अनुयायांनी गर्दी केली होती. करोना व अन्य कोणतेही निर्बंध नसल्याने नगर रस्ता दिवसभर गर्दीने फुलून गेला होता.कोरेगाव भिमा – जय जय भीम…डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो…. अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकत कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला २०६ व्या शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सोमवारी अनुयायांनी गर्दी केली होती.(koregaon Bhima )
अक्षरशः पुणे नगर रस्ता दिवसभर गर्दीने फुलून गेला होता तर पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले भीम अनुयायी,कपाळावर निळा टिळा , डोक्यावर निळा फेटा आणि छातीवर डॉकटर बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅच व कंठातून उमटणाऱ्या जय जय भीम या घोषणांनी कोरेगाव भीमा परिसर दुमदुमून गेला होता ३१ डिसेंबर व १ जानेवारी असा दोन दिवस साजरा होणाऱ्या अभिवादन सोहळ्यासाठी भीम अनुयायांनी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी रात्री बारापासूनच गर्दी केली होती.
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी दिवसभरात केंद्रीय मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मान्यवर; तसेच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे साडे पाचला मानवंदना दिली , वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, आमदार प्रकाश गजभिये, चंद्रशेखर आझाद आदींनी विजयस्तंभाला अभिवादन केले.भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ व रिपब्लिकन सेनेसह विविध संस्था व पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले.
जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, बार्टी आदी संस्थांनी कार्यक्रमासाठी चोख नियोजन केले होते. रात्री बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी समता सैनिक दल आणि लष्कराच्या महार रेजिमेंटच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.