सामाजिक बांधिलकी जपत गोरक्ष भोर यांचा अनोखा वाढदिवस साजरा करत १५० रक्तादात्यांनी केले रक्तदान
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा Koregaon Bhima (ता.शिरूर) (Shirur) ढेरंगे वस्ती येथे बाबाराजे देशमुख कट्टर समर्थक मराठा साम्राज्य संघ कोरेगाव भीमा अध्यक्ष गोरक्ष भोर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.(Youth celebrated ideal birthday by organizing blood donation camp at Koregaon Bhima)
यावेळी गोरक्ष भोर यांच्या मित्रपरिवाराने अनावश्यक खर्च व डिजे, जेवणावळी, मोठा बडेजावपणा टाळत एक सामाजिक विधायक उपक्रम राबवत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे .यामुळे अनेक गरजू रुग्णांच्या आयुष्याला नवा आधार आधार मिळणार असून अनेकांचे प्राण वाचणार आहे.
कोरेगाव भीमा परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्ता आहे यामुळे एकेकाळी वाढदिवस व इतर समारंभ मोठ्या दिमाखात साजरा करण्याची स्पर्धा पण कोरेगाव भीमा येथील अनेक सद्विचार व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुणांमुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक विधायक उपक्रम जात असतात.यामध्ये वृक्षारोपण , एखाद्या आश्रमात अन्नदान असे वाढदिवस साजरे करतात असतात.(Youth celebrated ideal birthday by organizing blood donation camp at Koregaon Bhima)
गोरक्ष भोर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत १५० तरुणांनी रक्तदान करत आपली मैत्री व सामाजिक बांधिलकी जपली असून तरुणाई एकत्र आल्यावर खूप चांगले समाजोपयोगी विधायक व दिशादर्शक काम होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.रक्तदात्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी अक्षय ब्लड बँकचे डॉ श्याम पांढरे,, महेश रधंवे, वैष्णवी सायंबर यांनी मोलाचे सह केले तर रवी गायकवाड, रवी सावळे, बालाजी निकरट, रोहन पिलोरे, विकास आपटे, तुकाराम मगर , राहुल जमादार , विशाल बडगर यांनी सहकार्य केले. (Youth celebrated ideal birthday by organizing blood donation camp at Koregaon Bhima)
रक्तदान शिबिराचे आयोजन माऊली डवाहान , बापूसाहेब ढेरंगे, अक्षय कदम, राजू टोणगे , संदीप खंडागळे, अंबादास बनसोडे ,आकाश ढेरंगे, विशाल ढेरंगे यांच्यावतीने करण्यात आले होते.
मराठा साम्राज्य संघ व बाबाराजे देशमुख यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचाराने प्रेरित होऊन अनावश्यक खरच टाळत आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करत वाढदिवस साजरा केला. – गोरक्ष भोर, अध्यक्ष मराठा साम्राज्य संघ ,कोरेगाव भीमा